राज्यातील संवेदनशील मार्गावर एसटी सेवा बंद राहणार; बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या भारत बंद पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संवेदनशील मार्गावरील एसटीची वाहतूक बंद राहणार आहे. तसेच या दरम्यान योग्य खबरदारी घेण्याचे आदेश एसटीच्या सर्व आगारांना प्रशासनाने दिले आहेत.

मुंबई :  राज्यसह मुंबईत ज्या मार्गावर आंदोलन होणार आहे किंवा होत आहे अशा रस्त्यांवर वाहतूक न करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे मंगळवारी संवेदनशील मार्गावर एसटी सेवा बंद राहणार आहे.

दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या भारत बंद पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संवेदनशील मार्गावरील एसटीची वाहतूक बंद राहणार आहे. तसेच या दरम्यान योग्य खबरदारी घेण्याचे आदेश एसटीच्या सर्व आगारांना प्रशासनाने दिले आहेत.

हे निर्देश एसटीच्या राज्यातील सर्व विभागांना आगारांना देण्यात आले आहेत. एसटी प्रशासनाने दिलेल्या निर्देशांनुसार, एसटीच्या स्थानिक प्रशासनानने माहिती घेऊन त्या-त्या मार्गावरची वाहतूक सुरू ठेवण्याबाबत निर्णय घ्यायचा आहे. तसेच ज्या मार्गावर, रस्त्यावर आंदोलन होणार आहे किंवा होत आहे अशा ठिकाणी वाहतूक करू नये असेही म्हटले आहे.

याबाबत एस.टी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भाेसले यांनी सांगीतले की, भारत बंदची वेळ आहे,  त्यावेळेतच एस.टी सेवा काही ठिकाणी बंद असेल,  इतर ठिकाणी एस.टी सेवा बंद नसेल, असे भाेसले म्हणाले.