एसटीचा प्रवास महागणार; ऑगस्टपासून दरवाढ लागू

एसटीला डिझेल भाववाढीमुळे दररोज दोन कोटींचे नुकसान होत आहे. एसटीला प्रवासी तिकिटवाढ करण्याशिवाय गत्यंतर नाही. ही दरवाढ अपरिहार्य आहे. मात्र, त्याबाबत आधी शासनाकडून मंजुरी घेतली जाणार आहे. एसटीचे कोणत्याही प्रकारचे खासगीकरण करण्याचा विचार नसल्याचे परब यांनी स्पष्ट केले.

    औरंगाबाद : डिझेल भाववाढीमुळे एसटीला दरदिवशी दोन कोटी रूपयांपेक्षा अधिक तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे एसटी प्रशासनासमोर आता प्रवासी तिकीट दरवाढीशिवाय पर्याय नाही. ऑगस्ट महिन्यापासून दरवाढ करावी असा प्रस्ताव महामंडळाकडून देण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकित प्रस्ताव मांडण्यात येणार असून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर नवीन दरवाढ जाहीर करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी यांनी सांगितले.

    एसटीला डिझेल भाववाढीमुळे दररोज दोन कोटींचे नुकसान होत आहे. एसटीला प्रवासी तिकिटवाढ करण्याशिवाय गत्यंतर नाही. ही दरवाढ अपरिहार्य आहे. मात्र, त्याबाबत आधी शासनाकडून मंजुरी घेतली जाणार आहे. एसटीचे कोणत्याही प्रकारचे खासगीकरण करण्याचा विचार नसल्याचे परब यांनी स्पष्ट केले.

    उत्पन्न वाढविण्यासाठी पेट्रोल पंप सुरू करणे, एसटीच्या बाहेरील ग्राहकांचे टायर रिमोल्डींग करणे अशा पर्यायावर विचार सुरू असून या माध्यमातून उत्पन्नवाढ करण्याचे नियोजन सुरू करण्यात आलेले असल्याचे त्यांनी सांगितले.