घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे मुद्रांक शुल्क माफ

हा निर्णय मोठा दिलासा देणारा असतानाचे ग्राहकांना मोठ्या संख्येने प्रकल्पाकडे आकर्षित करण्यासाठी बिल्डरांची आघाडीची नरेडेको संघटना पुढे सरसावली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत सदस्यांच्या १ हजार प्रकल्पात घर खरेदी केल्यानंतर शून्य टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार असल्याचे नरेडेको संघटनेचे अध्यक्ष राजन बांदीलकर यांनी सांगितले.

मुंबई : तुम्ही हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा विचार जर पक्का केला असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. एक रुपयाही मुद्रांक शुल्क न भरता तुम्हाला घर खरेदी करता येणार आहे. ही योजना बांधकाम व्यावसायिक संघटना नरेडेकोने जाहीर केली आहे. त्यामुळे घरांच्या किंमती चार ते पाच टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने मुद्रांक शुल्क २१ डिसेंबरपर्यंत २ टक्के केले आहे. नरेडेकोच्या ठराविक प्रकल्पात घरखरेदी करणाऱ्या ग्राहकांना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुद्रांक शुल्कावर पूर्णतः सवलत जाहीर करण्यात आली आहे.

हा निर्णय मोठा दिलासा देणारा असतानाचे ग्राहकांना मोठ्या संख्येने प्रकल्पाकडे आकर्षित करण्यासाठी बिल्डरांची आघाडीची नरेडेको संघटना पुढे सरसावली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत सदस्यांच्या १ हजार प्रकल्पात घर खरेदी केल्यानंतर शून्य टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार असल्याचे नरेडेको संघटनेचे अध्यक्ष राजन बांदीलकर यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, मुद्रांक शुल्क कमी करण्याचा सरकारने धाडसी निर्णय घेतला आहे. शून्य टक्के मुद्रांक शुल्कात घर खरेदी करणे शक्य होणार आहे. बँकेच्या व्याजाचा दरही कमी आहे. त्यामुळे ग्राहकांना विनंती आहे की, त्यांनी स्वप्नातील घर पाहून घ्यावे. योजनेचा लाभ घ्यावा. अशे आवाहन बांदीलकर यांनी केले. मुंबई पुणे आणि नाशिक सारख्या शहरातील प्रकल्पाचाही सहभाग आहे.


घरांच्या किंमती कमी होणार

त्यामुळे ग्राहकांना भरावा लागणाऱ्या २ टक्के मुद्रांक शुल्काची रक्कम नरेडेकोच भरणार आहे. कोरोना आणि टाळेबंदीने बांधकाम व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. घर खरेदी-विक्रीत मोठी घट झाली आहे.

 

बिल्डरांची संघटना नरेडेकोची घोषणा
या पार्श्वभूमीवर बंधकाम व्यवसायाला आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ५ टक्क्यांऐवजी २ टक्के मुद्रांक शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर १ जानेवारी ते ३१ मार्च २०१९ पर्यंत ५ टक्क्यांऐवजी ३ टक्के मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे.

अर्थचक्र सुरु होणार

बांधकाम व्यवसाय हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे रोजगार निर्माण करणारे क्षेत्र आहे. गृह खरेदीला चालना मिळाल्यास त्यावर अवलंबून असलेल्या २६९ पूरक व्यवसायांचे अर्थचक्रसुद्धा सुरु होईल. अशी आशा नरेडकोच्या अशोक मोहनानी यांनी व्यक्त केली आहे.