स्टॅन स्वामींची प्रकृती गंभीर, उच्च न्यायालयाने दिले ५ जुलैपर्यंत रुग्णालयात ठेवण्याचे निर्देश

स्टॅन स्वामी (८४)(Stan Swamy Ill) यांची प्रकृती खालावली असून गंभीर आहे. त्यामुळे त्यांना वैद्यकीय सेवेची गरज असल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने(Mumbai High Court) स्वामी यांना पुढील दोन आठवडे खासगी रुग्णालयातील उपचार घेण्याच्या मुदतीत वाढ केली.

    मुंबई: भीमा कोरेगाव हिंसाचार(Bheema Koregav) तसेच एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते, फादर स्टॅन स्वामी (८४)(Stan Swamy Ill) यांची प्रकृती खालावली असून गंभीर आहे. त्यामुळे त्यांना वैद्यकीय सेवेची गरज असल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने(Mumbai High Court) स्वामी यांना पुढील दोन आठवडे खासगी रुग्णालयातील उपचार घेण्याच्या मुदतीत वाढ केली.

    भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेले ८४ वर्षीय स्टॅन स्वामी तळोजा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्यांना पार्किन्सन्सचा आजार आहे. स्वामी यांनी आजारपणाच्या मुद्द्यावर विशेष एनआयए सत्र न्यायालयात दाखल केलेला सुटकेसाठीचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे स्वामी यांनी उच्च न्यायालयात अपील केले आहे.

    याआधी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान, त्यांची तब्येत ढासळती तब्येत पाहता न्यायालयाने स्वामी यांना १५ दिवस होली फॅमिली खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर १८ जूनपर्यंत वाढ करण्यात आली होती. गुरुवारी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर व्हीसीमार्फत सुनावणी पार पडली.

    न्यायालयाच्या निर्देशानुसार होली फॅमिली रुग्णालयाकडून स्वामीचा वैद्यकीय अहवाल सिलबंद लिफाफ्यात न्यायालयात सादर करण्यात आला. तेव्हा, स्वामी यांना कोरोनी लागण झाल्यानंतर अति दक्षता विभागात ठेवण्यात आले होते. त्यानंतर तब्येत सुधारल्यानंतर सामान्य वॉर्डमध्ये आणण्यात आले होते. मात्र, त्यांना आता ह्रदयासंबंधित त्रास होत असल्यामुळे पुन्हा आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती त्यांच्यावतीने वकील मिहिर देसाई यांना खंडपीठाला दिली.

    रुग्णालयाने सादर केलेला अहवालावरून स्वामी यांची प्रकृती खालावली असून गंभीर आहे. त्यामुळे त्यांना वैद्यकीय सेवेची गरज आहे. असे स्पष्ट करत खंडपीठाने ५ जुलैपर्यंत त्यांच्यावर होली फॅमिली रुग्णालायतच उपचार सुरू ठेवण्याचे निर्देश कायम ठेवत सुनावणी ३ जुलपर्यंत तहकूब केली.