अंधेरीतील क्रिडा संकुलाच्या ६० लाखांच्या दुरूस्तीचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर

जागतिक पातळीच्या आशियाई महिला करंडक फूटबॉल स्पर्धेचे आयोजन राज्यातील पुणे, नवीमुंबई आणि मुंबई येथे केले असून १७ फेब्रुवारी २०२२ ते ७ मार्च २०२२ दरम्यान हे सामने होणार आहेत.अंधेरीच्या शहाजी राजे भोसले क्रिडा संकुलात देखील हे सामने होणार आहेत. दरम्यान कोरोना काळात या संकुलाचा वापर नसल्याने याची डागडुजी करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने स्थायी समितीकडे ६० लाखाच्या दुरूस्तीचा प्रस्ताव आणला.

    मुंबई – आशियाई महिला करंडक फूटबॉल स्पर्धेचे आयोजन मुंबई, नवीमुंबई, पुणे येथे केले आहे. अंधेरीच्या शहाजी राजे भोसले क्रिडा संकुलात हे सामने होणार असल्याने या क्रिडा संकुलाची दुरूस्ती करण्याचा ६० लाखांचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीत मंजूरीसाठी आल्यानंतर त्यास प्रारंभी भाजपाच्या सदस्यांनी विरोध केला. मात्र स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिकेच्या दृष्टीने या प्रस्तावाचे महत्व त्यांनी स्पष्ट केले त्यांनंतर प्रस्ताव एकमताने मंजूर झाला . सदस्यांचा विरोधही मावळला.

    जागतिक पातळीच्या आशियाई महिला करंडक फूटबॉल स्पर्धेचे आयोजन राज्यातील पुणे, नवीमुंबई आणि मुंबई येथे केले असून १७ फेब्रुवारी २०२२ ते ७ मार्च २०२२ दरम्यान हे सामने होणार आहेत.अंधेरीच्या शहाजी राजे भोसले क्रिडा संकुलात देखील हे सामने होणार आहेत. दरम्यान कोरोना काळात या संकुलाचा वापर नसल्याने याची डागडुजी करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने स्थायी समितीकडे ६० लाखाच्या दुरूस्तीचा प्रस्ताव आणला.

    मात्र या प्रस्तावाला भाजपच्या सदस्यांनी तीव्र विरोध केला. असे तातडीचे प्रस्ताव आणून प्रशासन काय साध्य करू पाहत आहे असा सवाल त्यांनी केला. परंतु स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी या क्रिडा संकुलाची दुरूस्ती करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत सदस्यांनी समजून घ्यावे असे सांगितले. त्यानंतर त्यांचा विरोध मावळला आणि हा ६० लाखांच्या दुरूस्तीचा प्रस्ताव मंजूर झाला.