‘त्या’ 11 जिल्ह्यांतील कनिष्ठ न्यायालये पूर्ण क्षमतेने सुरू करा, मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीचे निर्देश

मुख्य न्या. दीपांकर दत्ता यांच्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत अलिबाग-रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, पालघर आणि बीड या राज्यातील ११ जिल्ह्यात कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता तेथील कनिष्ठ न्यायालयांचे कामकाज अर्धा दिवस सुरू ठेवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या यासमितीच्या बैठकीत या जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आल्याने या जिल्ह्यातील न्यायालयांना संपूर्ण दिवस काम करण्याचे निर्देश समितीकडून देण्यात आले आहेत.

    मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील निर्बंध शिथिलही करण्यात आले आहेत. त्याचाच आधार घेत कडक निर्बंध लागू असलेल्या त्या ११ जिल्ह्यातील कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीने दिले. हे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर, औरंगाबाद आणि गोवा खंडपीठालाही लागू राहतील.

    कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील क्रमाचऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यातच आता लसीच्या दोन्हीही मात्रा घेतलेल्यांना आणि वकिलांनाही ट्रेनने प्रवासाची मूभा द्यावी, अशी माघणी कऱणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर याआधी जुलै महिन्यात मुख्य न्या. दीपांकर दत्ता यांच्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत अलिबाग-रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, पालघर आणि बीड या राज्यातील ११ जिल्ह्यात कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता तेथील कनिष्ठ न्यायालयांचे कामकाज अर्धा दिवस सुरू ठेवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या यासमितीच्या बैठकीत या जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आल्याने या जिल्ह्यातील न्यायालयांना संपूर्ण दिवस काम करण्याचे निर्देश समितीकडून देण्यात आले आहेत.

    टास्क फोर्सच्या मुख्यमंत्र्यासोबत पार पडलेल्या बैठकीत दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मूभा देण्यात आली असल्याचा पुर्नउच्चार राज्य सरकारच्यावतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी केला. तसेच उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीच्या आगामी बैठकीत मुंबईसह राज्यातील कोरोना स्थिती आणि वकिलांच्या रेल्वे प्रवासावर चर्चा होणरा असल्याची माहिती त्यांनी खंडपीठाला दिली.