दोन दिवसांमध्ये उरकलेल्या अधिवेशनात १२ आकडा ठरला खास – निलंबित आमदारही १२ अन् संमत झालेली विधेयकेही १२, ‘इतके’ तास झाले काम

अधिवेशनात(Monsoon Session)१२ विधेयके पुनर्स्थापित करण्यात आली तर १२ शासकीय विधेयके संमत करण्यात आली आहेत. योगायोगाची गोष्ट म्हणजे निलंबित झालेल्या आमदारांची संख्याही १२ होती. 

    मुंबई : राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांचे वादळी अधिवेशन(Monsoon Session Of Assembly) संस्थगित झाल्याची घोषणा उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत केली. यावेळी त्यांनी दोन दिवसांत झालेल्या कामकाजाची माहिती दिली. त्यानुसार दोन दिवसांत सरासरी पाच तास दहा मिनटांच्या कामकाजातून एकूण दहा तास दहा मिनिटांचे कामकाज झाले आहे. त्यात एक तास पंचवीस मिनिटांचा वेळ वाया गेला आहे.

    अधिवेशनात१२ विधेयके पुनर्स्थापित करण्यात आली तर १२ शासकीय विधेयके संमत करण्यात आली आहेत. योगायोगाची गोष्ट म्हणजे निलंबित झालेल्या आमदारांची संख्याही १२ होती.याशिवाय ३ विधेयके लोकाभिप्रायासाठी मांडण्यात आली आहेत. नियम ४७ अन्वये दोन खुलासे तर चार शासकीय प्रस्तावांचे कामकाज या दोन दिवसांच्या सत्रात झाल्याची माहिती त्यांनी दिली.

    नागपूरला होणार पुढचे सत्र

    विधानसभेचे पुढील सत्र ७ डिसे २०२१ रोजी नागपूर येथे होणार असल्याची घोषणा त्यांनी केली.