हा वाद टाळून मेट्रो ३ लवकरात लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार काही वेगळी पावलं उचलेल, अशी चर्चा आहे. त्यासाठी राज्य सरकारनं मुंबईतील इतर काही जागांची चाचपणी मेट्रो ३ च्या कारशेडसाठी सुरू केलीय. मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात बुलेट ट्रेनसाठी प्रस्तावित असणाऱ्या जागेत मेट्रो ३ चं कारशेड उभारण्याचा विचार केला जाऊ शकतो, अशीही चर्चा सुरू आहे.
मुंबईतील मेट्रो ३ चं कारशेड कांजूरमार्गमध्ये उभं करण्याचं नियोजन होतं. मात्र उच्च न्यायालयानं या निर्णयाला स्थगिती दिलीय. त्यामुळे हा मुद्दा आता न्यायालयीन वादात अडकणार हे स्पष्ट झालं असून पुढील काही महिने यावर न्यायालयीन लढाई सुरू राहण्याची चिन्हं आहेत.
हा वाद टाळून मेट्रो ३ लवकरात लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार काही वेगळी पावलं उचलेल, अशी चर्चा आहे. त्यासाठी राज्य सरकारनं मुंबईतील इतर काही जागांची चाचपणी मेट्रो ३ च्या कारशेडसाठी सुरू केलीय. मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात बुलेट ट्रेनसाठी प्रस्तावित असणाऱ्या जागेत मेट्रो ३ चं कारशेड उभारण्याचा विचार केला जाऊ शकतो, अशीही चर्चा सुरू आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक बैठक बोलावली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या बैठकीत मुंबई मेट्रो ३ च्या कारशेडचं काम तात्पुरतं वांद्रे कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनच्या जागी हलवता येऊ शकेल का, याची चाचपणी करण्यात आली. ही जागा राज्य सरकारच्या मालकीची आहे. त्यामुळे इथे मेट्रो ३ चे कारशेड उभे करण्याबाबत निर्णय होऊ शकतो.
मेट्रोला गिरगावात विरोध केला
मग समृद्धी महामार्ग,कोस्टल रोड, वाढवण बंदर एवढेच नव्हे तर मुंबई-दिल्ली कॉरिडॉर..प्रत्येक विकास प्रकल्पाला फक्त विरोध, विरोध आणि विरोधच!
आता मेट्रो कारशेड उभारण्या पेक्षा या कारशेडला बीकेसीतील जागा निवडून
बुलेट ट्रेन होऊच नये असा डाव आखला जातोय. 1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 18, 2020
या निर्णयावरून सध्या महाविकास आघाडी विरुद्ध भाजप एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं चित्र तयार झालंय. बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम पोजेक्ट असल्यामुळे भाजपनं वांद्रे कुर्ला संकुलातील जागी मेट्रो ३ च्या कारशेडला विरोध केलाय. तर बुलेट ट्रेनपेक्षा मेट्रो ही मुंबईकरांची गरज असल्याचं सांगत महाविकास आघाडीचे नेते या निर्णयाचं समर्थन करतायत. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत.