cm school Reopen

  • दूध भूकटी पॅकींग करुन अमृत आहार योजनेतील मुलांना आणि स्तनदा माता तसेच गरदर महिलांना मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे झालेल्या बैठकीत दूध भुकटी पॅकिंग करून अमृत आहार योजनेतील ६,५१,००० मुलांना व १,२१,००० गरोदर, स्तनदा मातांना मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही योजना पुढे १ वर्ष राबविण्यात येणार असून १२१ कोटी खर्च अपेक्षित आहे.

दूध भूकटी पॅकींग करुन अमृत आहार योजनेतील मुलांना आणि स्तनदा माता तसेच गरदर महिलांना मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीस दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, त्याचप्रमाणे राज्यमंत्री बच्चू कडू, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महिला व बालकल्याण सचिव आय. ए. कुंदन, उपस्थित होते. या बैठकीत ही योजना पुढील १ वर्षासाठी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यासाठी १२१ कोटी रुपयांचा खर्च होणे अपेक्षित आहे. दुध भुकटीचा प्रती किलो उत्पादन करण्याचा खर्च २४५ रुपये ७० पैसे इतका आहे.

लॉकडाऊन काळात एप्रिल ते जुलै या काळात सरकारने शेतकऱ्यांकडून विकत घेतलेल्या ५,९८,९७,०२० लिटर दुधापासून ४४२१.२७ मेट्रीक टन दूध भुकटी तयार केली आहे. तसेच ५८९ मेट्रिक टन देशी बटर बनवून एनसीडीएफआय या पोर्टलवर २१५ रुपये किलो दराने विक्रीस देण्यात आले आहे. या योजनेतून शासनाला १२.४९ कोटी रुपये मिळतील असे सांगण्यात आले आहे.