शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत राज्य सरकारने काढलाय आदेश,नक्की काय म्हटलंय या आदेशात जाणून घ्या

सर्वसाधारण बदल्या एकूण कार्यरत पदांच्या १५ टक्के मर्यादेत १ ऑगस्टनंतर करता येणार नसल्याचा आदेश राज्य सरकारने(State Government Order) निर्गमित केला आहे.

    मुंबई : बदल्यांमध्ये घोटाळा(Scam In Transfer) केल्याचा आरोप करत महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi) सरकारवर विरोधक नेहमीच टीका करत असतात. मात्र सर्वसाधारण बदल्या एकूण कार्यरत पदांच्या १५ टक्के मर्यादेत १ ऑगस्टनंतर करता येणार नसल्याचा आदेश राज्य सरकारने(State Government Order) निर्गमित केला आहे.

    कार्यकाळ पूर्ण झाला अशाच बदल्या
    बदली अधिनियमातील कलम ६ अन्वये सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेनेच या कराव्यात. ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा संबंधित पदावर कार्यकाळ पूर्ण झाला अशाच बदल्या करण्यात याव्यात. तसेच या बदल्यांची कार्यवाही ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात यावी. यानंतर रिक्त राहतील पदांवर विशेष कारणास्तव बदल्या करण्यास १ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट पर्यंत परवानगी असेल असे याबाबतच्या सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशात म्हटले आहे.

    तिसऱ्या लाटेची शक्यता
    राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली तरी कोरोनाचा संसर्ग कायम आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेऊन राज्य सरकारने या आदेशात १४ ऑगस्टपर्यंत केवळ विहित कालावधी पूर्ण झालेल्या १५ टक्के मर्यादित सर्वसाधारण बदल्या करण्याचेही निर्देश दिले आहेत