State government offers 50 per cent rebate on restaurant, bar license fees, decision welcomed by restaurant owners

मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. परंतु या निर्णयावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. तसेच निर्णयाचे रेस्टॉरंट मालकांकडून स्वागत होत आहे. आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी राज्या सरकारचे आभार मानले आहेत.

मुंबई : कोरोना काळात मागील ८ महिन्यांपासून बंद असलेल्या उद्योग धंद्यांना उभारी देण्यासाठी राज्य सरकार अनेक उपक्रम आणि योजना लागू करत आहे. रेस्टॉरंट तसेच बारच्या परवाना शुल्कात ५० टक्के सुट तसेच प्रस्तावित १५ टक्के वार्षिक वाढ घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे मात्र सर्वच रेस्टॉरंट मालकांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे उद्योग क्षेत्राला उभारी मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.

मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. परंतु या निर्णयावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. तसेच निर्णयाचे रेस्टॉरंट मालकांकडून स्वागत होत आहे. आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी राज्या सरकारचे आभार मानले आहेत. कोरोनाच्या महामारीत उद्योगधंद्यांना फटका बसला होता. या उद्योगांना उभारी देणारा अत्यंत सकारात्मक निर्णय घेतला असल्याचे शिवानंद शेट्टी यांनी म्हटले आहे.

उद्योगक्षेत्राला स्थिती सुरळीत करण्याच्या दिशेने वाटचाल करण्यामध्ये मदत होईल. यात मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये ६० लाख प्रत्यक्ष रोजगार असण्यासोबत २ कोटी अप्रत्यक्ष रोजगार आहेत. त्या सर्वांना या निर्णयामुळे दिलासा मिळेल, असे आहारकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या निर्णयामुळे हॉटेल आणि बारचालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.