राज्य सरकारने पुन्हा केल्या सात सनदी अधिका-यांच्या बदल्या!

पुण्यात अतिरिक्त महानगर आयुक्त पदावरील कविता व्दिवेदी यांची बदली अकोला महानगरपालिकेत आयुक्त पदावर करण्यात आली आहे. तर प्रदिपकुमार डांगे यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या पदावर करण्यात आली.

    मुंबई (Mumbai): राज्य सरकारने (The state government) सात सनदी अधिका-यांच्या (chartered officers) बदल्या केल्या असून त्यात नाशिक येथील आदिवासी विकास सहकारी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (State Human Development Commissioner) एन. के. पाटील (N. K. Patil) यांची बदली औरंगाबाद (Aurangabad) येथे राज्य मानव विकास आयुक्त या पदावर केली आहे.

    राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. सी. एल. पुलकूडवार यांची बदली मंत्रालयात संचालक आपत्ती व्यवस्थापन विभाग महसूल वनविभाग या पदावर केली आहे. तर सध्या या पदावर कार्यरत असणारे एल एस माळी यांची बदली शुल्क नियंत्रण समिती मुंबई येथे सचिव या पदावर केली आहे.

    या शिवाय पुण्यात अतिरिक्त महानगर आयुक्त पदावरील कविता व्दिवेदी यांची बदली अकोला महानगरपालिकेत आयुक्त पदावर करण्यात आली आहे. तर प्रदिपकुमार डांगे यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या पदावर करण्यात आली आहे.

    मागील सप्ताहात बदली करण्यात आलेल्या दिपक सिंगला यांची पुन्हा बदली करण्यात आली असून आता त्यांना विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूरच्या सदस्य सचिव पदावरून नाशिक येथे आदिवासी विकास सहकारी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक या पदावर करण्यात आली आहे. या शिवाय श्रीमती भाग्यश्री बानायत यांची नियुक्ती सेरीकल्चर नागपूर या प्रकल्पाच्या संचालक पदावरून शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या मुख्याधिकारी पदावर करण्यात आली आहे.