कोरोनाच्या नावावर पळवाट काढू नका, किमान १५ दिवसांचे अधिवेशन घ्या, प्रविण दरेकर यांची मागणी

राज्य सरकारने कोरोनाचे(Corona) कारण सांगून अधिवेशन आटोपण्याचे काम करू नये. किमान पंधरा दिवस तरी अधिवेशनाचा कालावधी असावा, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली.

    मुंबई : राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाचे (Monsoon Session Of Assembly) कामकाज ठरविण्याबाबत उद्या दोन्ही सभागृहांच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक होत आहे. राज्यात अनेक महिन्यांपासून प्रलंबित विषयाचा तोडगा काढण्याकरीता अधिवेशन जास्त दिवसाचे असेल तर तपशीलवार चर्चा अधिवेशनात(Monsoon Session Of Assembly) करता येईल. त्यामुळे राज्य सरकारने कोरोनाचे(Corona) कारण सांगून अधिवेशन आटोपण्याचे काम करू नये. किमान पंधरा दिवस तरी अधिवेशनाचा कालावधी असावा, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली.

    राज्याची आर्थिक घडी विस्कळीत
    ते म्हणाले की, आज राज्यातील अनेक विषय प्रलंबित आहेत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे, मराठा आरक्षणासंदर्भात राज्यभर आंदोलन होत असुन पदोन्नती आरक्षण संदर्भात दलित समाजामध्ये संतप्त भावना उफाळून येत आहे. असे अनेक सामाजिक विषय या ठिकाणी आहेत.

    दरेकर म्हणाले की,  वर्ष दीड वर्षांच्या कालावधीत राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली असुन त्यामुळे, पुनः एकदा सर्वसामान्य लोकांचे उद्योगधंदे चालू होऊन, रोजी रोटी नोकऱ्याच्या माध्यमातून स्थिरता आणण्याची आवश्यकता आहे. तसेच बी बियाणे, अतिरिक्त भाव, कोकण संबंधित अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. दोन्ही चक्रीवादळामुळे कोकण आज उद्ध्वस्त झाला आहे. हे सर्व प्रश्न विधिमंडळाच्या सभागृहात चर्चेत येणे आवश्यक आहे.

    दरेकर म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक विषयांवर चर्चा करण्याकरीता पंधरा दिवसाचे अधिवेशन होण्याची आवश्यकता आहे. भाजपच्या वतीने आम्ही पावसाळी अधिवेशनाचा कालावधी जास्त दिवसाचा ठेवण्याची  मागणी करणार आहोत, असे दरेकर यांनी सांगितले.