ठाण्यातील इंजिनिअरला मारहाण केल्याप्रकरणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि जामीन; किरीट सोमय्या यांच्या ट्विटने खळबळ

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad) यांच्यावर सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे (Civil Engineer Anant Karamuse ) यांनी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट (FaceBook Post)   केली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यात सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे यांना झाली होती. या प्ररकरणी आव्हाड यांना आल्याचं ट्वीट भाजपा नेते किरीट सोमय्या(kirit somaiya) यांनी केलं आहे. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

  ठाणे: राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad) यांच्यावर सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे (Civil Engineer Anant Karamuse ) यांनी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट (FaceBook Post)   केली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यात सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे यांना झाली होती. या प्ररकरणी आव्हाड यांना आल्याचं ट्वीट भाजपा नेते किरीट सोमय्या(kirit somaiya) यांनी केलं आहे. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

  सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे हे ठाण्यातील घोडबंदर रोड येथे राहतात. करमुसे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती. त्यानंतर ५ एप्रिल रोजी करमुसे यांना येथील पोलीस रात्रीच्या दरम्यान बंगल्यावर घेऊन गेले आणि १५ ते २० जणांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. मारहाणीच्या वेळी आव्हाड देखील बंगल्यात उपस्थित होते असा उल्लेख करमुसे यांनी तक्रारीत केला होता.  आहे.

  यांनतर जिंतेद्र आव्हाड यांना अनंत करमुसे मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलं होतं. तसेच अटक करुन ठाणे पोलिसांनी आव्हाड यांना कोर्टासमोरदेखील हजर केलं होतं. या प्रकरणात कोर्टाने त्यांना तत्काळ जमीनदेखील दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आलेली कारवाई अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती अशी माहिती सुत्रांनी दिली.

  “अखेर ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी अटक झाली.”, असं ट्वीट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

  ऑनरेकॉर्ड अटक दाखवली असेल, नंतर जामिनाची व्यवस्था

  अनंत करमुसे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं. त्यांना कशाप्रकारे मारहाण करण्यात आली ये सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. आव्हाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत होती. मात्र, त्यांचच सरकार असल्यामुळे त्यांच्याविरोधात काहीही कारवाई झाली नसेल. मात्र आता कोर्टाच्या काही अडचणी अल्या असतील. तसेच इतर संभाव्य अडचणी आल्या असतील त्यामुळे ऑनरेकॉर्ड अटक दाखवली असेल. पण सरकार यांचच असल्याेमुळे जामिनाची व्यवस्था करुन ठेवली असेल, असा दावा प्रविण दरेकर यांनी केली.