uday samant

तंत्र व उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याचे कळविले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, गेले १० दिवसांपासून मी स्वतःला विलगिकरनात ठेवले आहे. तसे मी स्वतः कोविड टेस्ट करुन घेतला. रिपोर्ट कोरोना सकारात्मक आला आहे.

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग (corona) वेगाने पसरत आहे. आता अनेक दिग्गज नेत्यांना आणि मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते. तर आज राज्याचे तंत्र व उच्च शिक्षणमंत्री (State Minister for Technology and Higher Education ) उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. उदय सामंत (Uday Samant) गेल्या १० दिवसांपासून विलगीकरणात आहेत. उदय सामंत यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली आहे.


तंत्र व उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याचे कळविले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, गेले १० दिवसांपासून मी स्वतःला विलगिकरनात ठेवले आहे. तसे मी स्वतः कोविड टेस्ट करुन घेतला. रिपोर्ट कोरोना सकारात्मक आला आहे. मी गेले १० दिवस कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे. पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे. असे त्यांनी म्हटले आहे.