राज्यातील परिचारिकांची २१ जूनपासून आंदोलनाची हाक ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

या मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देखील पाठवले असल्याचे संघटनेकड़ून सांगण्यात आले. दरम्यान, या मागण्यांसाठी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही मागण्या मान्य होत नसल्याने परिचरिकांमध्ये नाराजी आहे. ज्यामुळे परिचारिकांनी आंदोलनाची हाक दिली आहे.

    मुंबई : राज्यातील सरकारी रुग्णालयातील परिचारिकांनी २१ जूनपासून आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनामुळे रुग्ण सेवेवर परिणाम होऊ नये यासाठी दोन दिवस २ तास काम बंद, दोन दिवस पूर्ण दिवस काम बंद असे स्वरुप आहे. पण तरीही आंदोलनानंतर मागण्या मान्य झाल्या नाही, तर २५ जूनपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने दिला आहे.

    या मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देखील पाठवले असल्याचे संघटनेकड़ून सांगण्यात आले. दरम्यान, या मागण्यांसाठी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही मागण्या मान्य होत नसल्याने परिचरिकांमध्ये नाराजी आहे. ज्यामुळे परिचारिकांनी आंदोलनाची हाक दिली आहे.

    आंदोलनाचे स्वरूप

    त्यानुसार (२१-२२ जून)ला दोन तास, (२३-२४ जून)ला पूर्ण दिवस. आणि (२५जून)पासून बेमुदत संप पुकारला आहे. कोरोना काळात राज्यभरातील परिचारिका संपावर गेल्या, तर त्याचा मोठा फटका आरोग्य यंत्रणेला बसणार आहे.

    मागण्या :

    राज्यात सरकारी रुग्णालयात परिचारिकांची संख्या कमी आहे. अनेक वर्षे रिक्त पदे भरली न गेल्याने ही संख्या कमी असून, सध्या सेवेत असलेल्या परिचारिकांवर कामाचा ताण आहे. तर कोरोना काळात हा ताण प्रचंड वाढला आहे. त्यामुळे रिक्त पदे भरावी आणि पदोन्नती द्यावी अशी मुख्य मागणी परिचरिकांची आहे.

    कोविड काळात सरकारी परिचारिका जिवाची बाजी लावत रुग्णसेवा देत आहेत. पण त्यांना योग्य तो मोबदला मिळत नाहिये. त्यामुळे कोविड भत्ता वाढवावा, केंद्र सरकारप्रमाणे कोविड भत्ता द्यावा. कोरोना काळात ७ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टी द्यावी.
    शिल्लक रजेचा प्रश्न सोडविण्यात येत नाहिये.