राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना सहा महिने मुदतवाढ

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याने सदर प्रकल्प पूर्ण करण्याची बाब विचारात घेवून सहा महिन्यासाठी ही मुदतवाढ असेल. 

    मुंबई: राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या पदावर करार पध्दतीने करण्यात आलेल्या राधेश्याम मोपलवार यांच्या नियुक्तीला राज्य सरकारने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याने सदर प्रकल्प पूर्ण करण्याची बाब विचारात घेवून सहा महिन्यासाठी ही मुदतवाढ असेल.

    याबाबतच्या शासन निर्णयात म्हटले आहे की, यापूर्वी २८ फेब्रु.२०२० रोजी या पदाला देण्यात आलेल्या मुदतवाढीचा कालावधी ३१ मे २०२१ रोजी पूर्ण झाल्याने ही मुदतवाढ दिली जात आहे.