udhav thackrey

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या प्रश्नावर आमचा पाठिंबा आहे. त्यांनी योग्य विचार मांडला. सकाळी दहा ते पाच या वेळा बदलण्यावर थोडी चर्चा केली तर मार्ग निघेल. आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत. केंद्र व राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना घराच्या पाच किमीच्या परिसरातील कार्यालयांमध्ये नियुक्ती दिल्यास निम्मा प्रश्न मिटेल.

    मुंबई: पुन्हा नव्याने वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ऑफिसच्या वेळा बदलण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाची बैठक बोलावली होती. त्यात ऑफिसची सकाळी दहा ते सायं पाचची पारंपरिक वेळेची मानसिकता बदलण्यासाठी केंद्राने धोरण आखण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.

    राज्यातील कामगार संघटनांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचे स्वागत केले आहे. सार्वजनिक वाहतुकीवरील ताण व त्यातून होणारे अपघात टाळण्यासासाठी मुंबई व परिसरातील सरकारी कार्यालयांमधील वेळांमध्ये लवचिकता आणण्याची मागणी दोन वर्षांपूर्वीच कोरोना नसताना केली होती. कोविडच्या काळात शिक्षण, कर संकलन, जीएसटी अशा विभागांतील कर्मचाऱ्यांनी वर्प फ्रॉम होम केले. आताही गर्दी कमी करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना व्हीपीएनव्दारे काम करण्याची सुविधा दिली तर ते वर्प फ्रॉम होम करू शकतात, असे मत विनोद देसाई, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांनी व्यक्त केले आहे.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या प्रश्नावर आमचा पाठिंबा आहे. त्यांनी योग्य विचार मांडला. सकाळी दहा ते पाच या वेळा बदलण्यावर थोडी चर्चा केली तर मार्ग निघेल. आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत. केंद्र व राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना घराच्या पाच किमीच्या परिसरातील कार्यालयांमध्ये नियुक्ती दिल्यास निम्मा प्रश्न मिटेल, असेही ते म्हणाले आहेत .