दुध उत्पादकांचा १ ऑगस्टपासून राज्यव्यापी एल्गार

  • आंदोलनात दुधाला प्रति लिटर ३० रुपये देण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच या राज्यसरकारच्या वतीने शेतकऱ्याच्या खात्यात १० रुपये जमा करण्यात यावे. पंतप्रधानांनी अद्यादेश काढत परदेशातून १० लाख टन दुध पावडर निर्यात करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी. हा निर्णय शेतकऱ्यांचा घात करणारा आहे. तसेच जेनरिक मेडिसिनच्या बदल्यात अमेरिकेतील दुध आणि दुग्दजन्य पदार्थांच्या आयातीला परावनगी देणारा निर्णय रद्द करावा अशी मागणी केली आहे.

मुंबई – राज्य दुधाचे भाव पडल्याने दुध उत्पादक संकटात आले आहेत. दुधाचे भाव वाढवण्यासाठी आंदोलने केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर दुध उत्पादकांचा विविध मागण्यांसाठी १ ऑगस्ट रोजी राज्यभर गावोगावी दुधाचा अभिषेक घालत तीव्र आंदोलन करण्याची हाक दिली आहे. ह्या आंदोलनाबाबत किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने माहिती दिली आहे. तसेच घोषणाही केली आहे. 

या आंदोलनात दुधाला प्रति लिटर ३० रुपये देण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच या राज्यसरकारच्या वतीने शेतकऱ्याच्या खात्यात १० रुपये जमा करण्यात यावे. पंतप्रधानांनी अद्यादेश काढत परदेशातून १० लाख टन दुध पावडर निर्यात करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी. हा निर्णय शेतकऱ्यांचा घात करणारा आहे. तसेच जेनरिक मेडिसिनच्या बदल्यात अमेरिकेतील दुध आणि दुग्दजन्य पदार्थांच्या आयातीला परावनगी देणारा निर्णय रद्द करावा अशी मागणी केली आहे. तसेच राज्यातील गोदामात पडलेले दुध पावडरची निर्यात करुन प्रतिकिलो ५० रुपयेचा भाव द्यावा. अशा विविध माणीसाठी राज्यात २० जुलैपासून किसान सभा आणि समविचारी संघटना, दुध उत्पादक शेतकरी आंदोलन करीत आहेत. 

लॉकडाऊन काळात दुधाला भाव मिळत नाही आहे. लॉकडाऊनच्या आधी दुध ३० रुपये लिटरने विकले जात होते. परंतु लॉकडाऊन झाल्यापासुन दुधाची मागणी घटली आणि दुधाची किंमत १८ रुपयावर आली. राज्यसरकारने दखल घेत प्रति दिन १० लाख लिटर दुध विकत घेण्याचे ठरवले परंतु या योजनेत शेतकऱ्याना २५ रुपये हमीभाव मिळत होता. मात्र ही योजना सरकारने सहकारी दूध संघांना लागु केली.