परमबीरसिंग आणि रश्मी शुक्ला प्रकरणात मुख्य सचिवांचा जबाब, सीबीआय आणि मुंबई पोलिसांकडे एकत्र नोंदवला जबाब

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रूपये कथित खंडणी प्रकरणी आरोप केले आहेत. त्याबाबत तत्कालिन गृहसचिव म्हणून कुंटे यांचा जबाब दूरदृश्य प्रणालीव्दारे सीबीआयने नोंदवून घेतल्याची माहिती या सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर रश्मी शुक्ला यानी केलेल्या फोन टँपिंग प्रकरणातही माजी गृहसचिव या नात्याने सिताराम कुंटे यांचा जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवून घेतल्याचे या सूत्रांनी सांगितले.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग आणि माजी गुप्तवार्ता विभाग प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणात तत्कालीन गृह सचिव या नात्याने मुख्य सचिव सिताराम कुंटे यांचा जबाब नुकताच सीबीआय आणि मुंबई पोलिसांनी देखील नोंदवून घेतल्याची माहिती मंत्रालयीन सूत्रांनी दिली आहे.

    अधिकारांचा दुरूपयोग आणि गोपनीयता भंगाचा ठपका

    माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रूपये कथित खंडणी प्रकरणी आरोप केले आहेत. त्याबाबत तत्कालिन गृहसचिव म्हणून कुंटे यांचा जबाब दूरदृश्य प्रणालीव्दारे सीबीआयने नोंदवून घेतल्याची माहिती या सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर रश्मी शुक्ला यानी केलेल्या फोन टँपिंग प्रकरणातही माजी गृहसचिव या नात्याने सिताराम कुंटे यांचा जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवून घेतल्याचे या सूत्रांनी सांगितले.

    रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणात  विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बदल्यांच्या घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर कुंटे यांनी मुख्य सचिव या नात्याने शुक्ला यांच्या विरोधात चौकशी अहवाल राज्य सरकारला सादर केला होता त्यात अधिकारांचा दुरूपयोग आणि गोपनीयता भंगाचा ठपका शुक्ला यांच्यावर ठेवण्यात आला होता.