सरकार पाडण्याचे विधान चुकीचे, मी असं बोललोच नाही : गृहमंत्री अनिल देशमुख

राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा कट रचला होता. परंतु वेळेतच तो हाणून पाडला गेला. अशी बातमी आज प्रसिद्ध झाली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला होता.

मुंबई : राज्यातील काही पोलीस अधिकारी सरकार (government) पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचं वृत्त  (Statement) निराधार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी म्हटले आहे. मी असं काहीही वक्तव्य केले नाही, माझ्या तोंडी ते वक्तव्य टाकण्यात आलं आहे. असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. पुण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अनिल देशमुख यांनी असे वक्तव्य केले आहे.

राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा कट रचला होता. परंतु वेळेतच तो हाणून पाडला गेला. अशी बातमी आज प्रसिद्ध झाली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला होता. असंही सांगितले जात आहे. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारलं असता त्यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. तसेच मी असे काहीही बोललेलो नाही असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

अनिल देशमुख यांनी दिले स्पष्टीकरण

राज्यातील पोलीसांनी कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावताना महाराष्ट्र पोलीस थकले, मात्र हिंमत हरले नाहीत, अशा शब्दात त्यांनी राज्यातील पोलिसांचे कौतुक केले. लॉकडाऊनच्या काळात वाधवान प्रवासाची परवानगी दिल्या प्रकरणी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता यांची पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. या संदर्भात विचारण्यात आले असता ते म्हणाले, अमिताभ गुप्ता यांची वाधवान प्रकरणात चौकशी झाली तसेच त्यांना सुचविल्यानुसार शिक्षा झाली आहे. असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.