मराठा क्रांती मोर्चाचे राज्यभर आंदोलन, ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation)  राज्याच्या विविध भागात आज गुरूवारी मराठा क्रांती मोर्चा आंदोलन सुरू झालं आहे. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्हा तर्फे पुणे (Pune) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली गेली. जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.

मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation)  राज्याच्या विविध भागात आज गुरूवारी मराठा क्रांती मोर्चा आंदोलन ( Maratha Kranti Morcha) सुरू झालं आहे. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्हा तर्फे पुणे (Pune) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली गेली. जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरातही (Kolhapur) मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. पुण्या-मुंबईकडे (Pune-Mumbai) जाणारा दूध पुरवठा आंदोलक रोखण्याचा इशारा देण्यात आला. आज कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या प्रवेश द्वारावर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजीमध्ये पुण्या मुंबईला जाणारे दूध वाहतूक करणारे टँकर रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले.

औरंगाबादमध्ये (Aurangabad) मराठा क्रांती मोर्चाने आज ढोल बजाव आंदोलन केलं आहे. तसेच जालन्यात (Jalna)  मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा दिल्या. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.