ग्लोबल टेंडरबाबत अजूनही अनिश्चितता; BMC तीन दिवसांत अंतिम निर्णय

लस खरेदीसाठी मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या ग्लोबल टेंडरबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. ग्लोबल टेंडरला ११ जणांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी एकाने माघार घेतली आहे. १० निविदाकारांपैकी एकही लस उत्पादक कंपनीचा प्रस्ताव आलेला नाही. या सर्व निविदाकारांनी स्पुटनिक लस वितरणाचा दावा केला आहे. परंतु अद्याप एकही निविदाकार लस उत्पादकाबरोबर लस पुरवठ्याबाबत केलेल्या करारनाम्याची प्रत देऊ शकलेला नाही त्यामुळे लसीचा पुरवठा नेमका कसा होणार याची अद्याप अस्पष्टता आहे. दरम्यान, प्रशासन याबाबत दोन ते तीन दिवसात अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी स्थायी समितीत दिली.

    मुंबई : लस खरेदीसाठी मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या ग्लोबल टेंडरबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. ग्लोबल टेंडरला ११ जणांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी एकाने माघार घेतली आहे. १० निविदाकारांपैकी एकही लस उत्पादक कंपनीचा प्रस्ताव आलेला नाही. या सर्व निविदाकारांनी स्पुटनिक लस वितरणाचा दावा केला आहे. परंतु अद्याप एकही निविदाकार लस उत्पादकाबरोबर लस पुरवठ्याबाबत केलेल्या करारनाम्याची प्रत देऊ शकलेला नाही त्यामुळे लसीचा पुरवठा नेमका कसा होणार याची अद्याप अस्पष्टता आहे. दरम्यान, प्रशासन याबाबत दोन ते तीन दिवसात अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी स्थायी समितीत दिली.

    मुंबईत लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पालिकेने ग्लोबल टेंडर काढले आहे. याला ११ पुरवठादारांनी प्रतिसाद दिला आहे. त्यातील आता एकाने माघार घेतली आहे. मात्र एकाही निविदाकारांनी लस उत्पादकाबरोबर लस पुरवठ्याबाबत केलेल्या करारनाम्य़ाची प्रत देऊ शकलेला नाही. त्यामुळे लशीच्या पुरवठाबाबत अजूनही स्पष्टता झालेली नाही.

    आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत लशीबाबत सद्यस्थिती काय आहे, किती दिवसात लस पुरवठा होणार, किती संख्येने लस पुरवली जाईल तसेच लसीचा दर व रक्कम काय असेल असे प्रश्न विचारत भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी मुद्दा उपस्थित केला. मुंबईकरांचे तातडीने लसीकरण झाल्यास कोरोनाची संभाव्य तिसरी लाट वेळीच रोखता येईल. यासाठी सर्व वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. सद्या लस उपलब्ध नसल्याने शहरातील ८० टक्के लसीकरण केंद्र बंद आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून अनेकांना लसीकरण केंद्रावरून लस न घेता माघारी जावे लागत आहे. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या अनेक वयस्कर नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

    यातून मुंबईतील लसीकरण मोहिमेचे नियोजन बिघडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. लशींसाठी पालिकेने ग्लोबल टेंडर मागवले आहे. मात्र त्याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. त्याबाबत सद्यस्थिती काय आहे, याबाबतची माहिती द्यावी अशी मागणी शिंदे यांनी केली. यावर ग्लोबल टेंडरला ११ जणांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी एकाने माघार घेतली आहे. १० निविदाकारांपैकी एकही लस उत्पादक कंपनीचा प्रस्ताव आलेला नाही. या सर्व निविदाकारांनी स्पुटनिक लस वितरणाचा दावा केला आहे.

    परंतु अजूनही अद्याप एकही निविदाकार लस उत्पादकाबरोबर लस पुरवठ्याबाबत केलेल्या करारनाम्याची प्रत देऊ शकलेला नाही प्रशासन याबाबत दोन ते तीन दिवसात अंतिम निर्णय घेणार आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी स्थायी समितीत दिली असल्याचे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, अद्याप ग्लोबल टेंडरद्वारे लस उपलब्धतेबाबत अनिश्‍चितता कायम आहे ही बाब गंभीर असल्याचे भाजपने म्हटले आहे.