drugs supplier in mumbai exposed bollywood drug scam reality

मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका 50 वर्षीय महिलेला अटक केली आहे. महिलेकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल तीन कोटी आठ लाख दहा हजार रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. ही महिला देशातली अंमली पदार्थांची सर्वात मोठी सप्लायर असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. अंमली पदार्थांचा एवढा मोठा साठा असलेल्या या महिलेला मुंबईतील प्रसिद्ध आणि हायप्रोफाईल अशा काळबादेवी परिसरातून अटक करण्यात आली आहे.

    मुंबई : मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका 50 वर्षीय महिलेला अटक केली आहे. महिलेकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल तीन कोटी आठ लाख दहा हजार रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. ही महिला देशातली अंमली पदार्थांची सर्वात मोठी सप्लायर असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. अंमली पदार्थांचा एवढा मोठा साठा असलेल्या या महिलेला मुंबईतील प्रसिद्ध आणि हायप्रोफाईल अशा काळबादेवी परिसरातून अटक करण्यात आली आहे.

    ही महिला परिसरामध्ये एखाद्या साधारण गृहिणीसारखी वावरत होती. पण तिच्याबाबत मुंबई पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी कारवाई केली. अटक केली तेव्हा महिलेकडे 1 किलो 27 ग्रॅम हेरॉइन होते. महाराष्ट्राच्या बाहेरून महिलेला मोठ्या अंमलीपदार्थांचा पुरवठा होत असल्याचेही समोर येत आहे.

    आंतरराष्ट्रीय टोळीशीही तिचे संबंध असल्याची चर्चा आहे. त्यामुळं अंमली पदार्थ तस्करीची पाळेमुळे कुठपर्यंत रुतली आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे अशा मोठ्या शहरांत तस्करांना ती अंमली पदार्थांचा पुरवठा करत होती. अंमली पदार्थविरोधी पथकाच्या मते, या महिलेचे राजकीय संबंध अशून तिच्यावर मोठा वरदहस्त अशल्याचीही शक्यता आहे.