प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोरोना साथीच्या या काळात फॅविपिरावीर व हायड्रोक्सी क्लोरोक्यीनच्या बनावट औषधांचा १.५४ कोटी रुपयांचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे. हा सर्व साठा हिमाचल प्रदेशातील सोलन येथून मागविण्यात आला होता.

    मुंबई : कोरोना साथीच्या या काळात फॅविपिरावीर व हायड्रोक्सी क्लोरोक्यीनच्या बनावट औषधांचा १.५४ कोटी रुपयांचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे. हा सर्व साठा हिमाचल प्रदेशातील सोलन येथून मागविण्यात आला होता.

    या बनावट औषधांच्या साठ्याची मुंबईत विक्री होत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागाला मिळाली होती. त्यानुसार प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील तीन औषध विक्रेत्यांवर एकाच वेळी छापा टाकला. त्यात गोरेगाव पूर्व येथील शिवसृष्टी सर्जीमेड, कांदिवली पूर्व येथील मेडीटेब वर्ल्डवाईड व नीरव ट्रेडलिंक यांचा समावेश होता.

    या सर्व बनावट औषधांवर उत्पादकाचे नाव सोलन येथील मॅक्स रिलीफ हेल्थकेअर असे होते. पण वास्तवात ही उत्पादन संस्था अस्तित्वातच नसल्याची माहिती हिमाचल प्रदेशच्या औषध नियंत्रकांनी ई-मेलद्वारे प्रशासनाला कळवली आहे. तसेच या कंपनीचे मालक सुदीप मुखर्जी यांच्याकडे या औषधांचे उत्पादन व विक्रीबाबत कोणतीही कागदपत्रे नसल्याचे दिसून आले. यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील चौकशीसाठी त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.