रामदेव बाबांची गोबर, गोमूत्र आणि कोरोनील ही थेरपी बंद करा; नवाब मलिक कडाडले

रामदेव बाबांसारखे लोक गोमूत्र, गोबर आणि कोरोनिल काढतात. अॅलिओपॅथीवर संशय घेतात. त्यामुळे आयएमएने रामदेव बाबांना नोटीसा पाठवल्या पाहिजे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी योगगुरू रामदेव बाबांवर टीका केली आहे. तसेच गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपीच आता बंद करा, अशी मागणी त्यांनी केली.

    मुंबई : रामदेव बाबांसारखे लोक गोमूत्र, गोबर आणि कोरोनिल काढतात. अॅलिओपॅथीवर संशय घेतात. त्यामुळे आयएमएने रामदेव बाबांना नोटीसा पाठवल्या पाहिजे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी योगगुरू रामदेव बाबांवर टीका केली आहे. तसेच गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपीच आता बंद करा, अशी मागणी त्यांनी केली.

    नदीमध्ये मृतदेह प्रवाहीत करणे, ऑक्सिजन अभावी लोके मरत आहेत, औषधांचा तुटवडा आहे, देशात लस उपलब्ध नसताना लस देण्याचा कार्यक्रम जाहीर करणे, हे इंडियन मॉडेल कोणीच स्वीकारणार नाही अशा शब्दात त्यांनी मोदींच्या इंडियन मॉडेलचा समाचार घेतला. इंडियन मॉडेल झालेच पाहिजे परंतु हेच इंडियन मॉडेल असेल तर लोकांना यावर बोट ठेवण्याची संधी भाजपा निर्माण करुन देतेय असेही मलिक म्हणाले.

    तसेच भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी महाराष्ट्र आणि केरळलाही आर्थिक मदत देण्याचं ट्विट केलं होतं. पण नंतर ते त्यांनी डिलीट केलं. भाजपचा इतर पक्षाच्या नेत्यांवर आजवर दबाव होता. आता भाजपला आपल्या नेत्यांवरही दबाव टाकावा लागतोय, असा टोलाही त्यांनी

    विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. यासोबतच, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. असून खोळंबा, नसून वळिंबा ही म्हण, महाविकास आघाडी सरकारला चपखल बसते. राज्याच्या हितासाठी ह्यांचा सत्तेत असून किंवा नसून पण काहीच उपयोग नाही! मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, उपमुख्यमंत्री पुण्याच्या बाहेर विचार करत नाहीत, अन् कौशल्य विकासमंत्री कामाचे सोडून सर्वकाही बडबडतात, असा टोला दरेकर यांनी लगावला आहे.