rajesh tope

कोरोना उपचारांसाठी दाखल होणाऱ्या रुग्णांवर डिपॉझिट आणि अनावश्यक चाचण्यांच्या माध्यमातून जास्त बिल आकारणी करणाऱ्या खासगी रुग्णालयांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी इशारा दिला आहे.

    मुंबई : कोरोना उपचारांसाठी दाखल होणाऱ्या रुग्णांवर डिपॉझिट आणि अनावश्यक चाचण्यांच्या माध्यमातून जास्त बिल आकारणी करणाऱ्या खासगी रुग्णालयांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी इशारा दिला आहे.

    कोरोना रुग्णांना दाखल करुन घेण्याआधी काही रुग्णालये रुग्णांच्या नातेवाईकांना 50 हजार ते एक लाखापर्यंत एकगठ्ठा रक्कम डिपॉझिट करायला लावत असल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत, असे टोपे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

    तसेच कोरोना व्हायरसवर रेमडेसिविर इंजेक्शन प्रभावी ठरत आहे. राज्याच्या टास्क फोर्सने जे नियम आखून दिलेयत, त्यानुसारच रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर करावा, असेही राजेश टोपे म्हणाले.