Special train from Dadar to Sawantwadi Road
दादर ते सावंतवाडी रोड दरम्यान विशेष ट्रेन

२५ मे रोजी ओडीशामध्ये यास चक्रीवादळ धडणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतू ओडीशाला जाणाऱ्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. ०१०१९ सीएसएमटी-भुवनेश्वर विशेष जेसीओ २५ आणि २५ मे रोजी रद्द करण्यात आली आहे. ०१०२० भुवनेश्वर-सीएसएमटी विशेष २५ आणि २६ मे रोजी रद्द करण्यात आली आहे. ०२१४५ एलटीटी-पुरी विशेष जेसीओ २३ मे आणि ०२१४६ पुरी­-एलटीटी २५ मे रोजी रद्द करण्यात आली आहे.

    मुंबई : काही दिवसांपूर्वी केरळ, गोवा, महाराष्ट्र, गुजरातमध्ये चक्रीवादळाने धुमाकूळ घातल्यानंतर आता पुन्हा एका संभाव्य चक्रीवादळामुळे भीतीचे सावट पसरले आहे. बंगालच्या खाडीत तयार होत असलेल्या वादळाचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता असून ते 26 मे रोजी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्याला धडक देणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. शनिवारी पूर्व मध्य बंगालच्या खाडीत तसेच उत्तर अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याची माहितीही खात्याने दिली. यासोबतच ओडिशा सरकारने राज्यातील सर्व किनारपट्टीवरील भागात हाय अलर्ट जारी केला आहे. मुख्य सचिव सुरेशचंद्र महापात्र यांनी उच्चाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून प्रशासनाला तयार राहण्याचे निर्देश दिले. येत्या सोमवारी आणि मंगळवारी मुंबईत पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाआहे.

    २५ मे रोजी ओडीशामध्ये यास चक्रीवादळ धडणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतू ओडीशाला जाणाऱ्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. ०१०१९ सीएसएमटी-भुवनेश्वर विशेष जेसीओ २५ आणि २५ मे रोजी रद्द करण्यात आली आहे. ०१०२० भुवनेश्वर-सीएसएमटी विशेष २५ आणि २६ मे रोजी रद्द करण्यात आली आहे. ०२१४५ एलटीटी-पुरी विशेष जेसीओ २३ मे आणि ०२१४६ पुरी­-एलटीटी २५ मे रोजी रद्द करण्यात आली आहे.

    चक्रीवादळाच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलही सतर्क झाले आहे. राज्य सरकारही नौदल अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून एनडीआरएफची पाच पथके गुजरातहून ओडिशात दाखल झाली आहेत. यासोबतच एनडीआरएफची 17 पथके, ओडीआरएएफची 20 बटालियन आणि फायर सर्व्हिसेसची 100 पथकेही सज्ज असल्याची माहिती प्रशासनाने दिली.