Storm surge in Dahisar for vaccinations; The fuss of social distance

राज्य सरकारने ‘ब्रेक दी चेन’ अंतर्गत राज्यासह मुंबईत कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. तर दुसरीकडे कोविड सेंटरवर लस घेण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी कायम आहे, असेच चित्र शनिवारी दहिसर कोविड सेंटरमध्ये पहावयास मिळाले. येथे लस घेण्यासाठी लांबच्या लांब रांग लागली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र येथे पहावयास मिळाले.

    मुंबई : राज्य सरकारने ‘ब्रेक दी चेन’ अंतर्गत राज्यासह मुंबईत कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. तर दुसरीकडे कोविड सेंटरवर लस घेण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी कायम आहे, असेच चित्र शनिवारी दहिसर कोविड सेंटरमध्ये पहावयास मिळाले. येथे लस घेण्यासाठी लांबच्या लांब रांग लागली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र येथे पहावयास मिळाले.

    दहिसर पूर्व हायवेच्या जवळच असलेल्या जम्बो काेविड सेंटरमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी नागरिकांची रांग लागली होती. रांगेमध्ये ४५ सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांची संख्या होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आता सर्वांना लस घ्यायची आहे. त्यामुळे कडक उन्हातही ताटकाळत लाभार्थी उभे राहिले होते. जम्बो कोविड सेंटरवर उन्हापासून बचाव होईल, अशी कोणतीच व्यवस्था केल्याचे दिसून आले नाही.

    रांगेमध्ये उभ्या असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले की, पहिला डोस घेऊन ४८ दिवस उलटले तरीही दुसरा डोस मिळालेला नाही. दररोज लाभार्थी कोविड सेंटरच्या फेऱ्या मारतात. परंतु, येथील असुविधेमुळे दुसरा डोस मिळत नाही. स्थानिक आमदार प्रकाश सुर्वेंकडे येथे लाभार्थींना उभे राहण्यासाठी व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.

    उद्धव ठाकरेंनी ‘ब्रेक दी चेन’ मोहीम राबवली आहे. परंतु, येथे होणाऱ्या गर्दीकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. दररोज ३ हजारांहून अधिक जणांना लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ५ हजारांहून अधिक रांगेत उभे राहतात आणि ३ हजार जणांना लसीचे कुपन दिले जाते. उर्वरित जणांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगतात.

    - रमेश गायकवाड, स्थानिक रहिवासी, दहिसर