Don't go for ST strike! There is no settlement on Monday either; The High Court directed the organization to present its position before the three-member committee

गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र राज्यात कोरोना ठाण मांडून  आहे. आता राज्यात दुसऱ्यांदा लाॅकडाऊन करणार असल्याची घाेषणा राज्य सरकारने केली आहे. अशी स्थिती असताना, जीवाची पर्वा न करता प्रवाशांना सुखरुप घरी पाेहचविण्यासाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी अहाेरात्र कार्यरत आहेत. पण प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी एसटी महामंडळ मात्र कानाडाेळा करत असल्याचे वारंवारं समाेर येत आहे. याच पार्श्वभूमीवर, एसटीच्या गाड्या सॅनिटाईज करण्यासाठी महामंडळाने तब्बल वर्षभरानंतर निविदा काढल्या आहेत.

    मुंबई : गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र राज्यात कोरोना ठाण मांडून  आहे. आता राज्यात दुसऱ्यांदा लाॅकडाऊन करणार असल्याची घाेषणा राज्य सरकारने केली आहे. अशी स्थिती असताना, जीवाची पर्वा न करता प्रवाशांना सुखरुप घरी पाेहचविण्यासाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी अहाेरात्र कार्यरत आहेत. पण प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी एसटी महामंडळ मात्र कानाडाेळा करत असल्याचे वारंवारं समाेर येत आहे. याच पार्श्वभूमीवर, एसटीच्या गाड्या सॅनिटाईज करण्यासाठी महामंडळाने तब्बल वर्षभरानंतर निविदा काढल्या आहेत.

    उशीरा काढण्यात आलेल्या निविदाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले  आहेत. महामंडळाने उशीरा निविदा का काढल्या? मागील वर्षभरात गाड्या सॅनिटाईझ हाेत हाेत्या का? निविदा काढण्याची आता काय गरज? अशी चर्चा सध्या महामंडळात जाेरदार सुरु आहे.

    वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यांमध्ये 30एप्रिल पर्यंत पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. या मिनी लॉकडाऊन काळात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस कोविड नियमाची अट घालून सुरू ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, एसटीच्या बसेस नियमितपणे सॅनिटाईझ होत नसल्याचे बाेलले जात आहे. गेल्या एका वर्षानंतर बसेस सॅनिटाईझ करण्यासाठी महामंडळाने काही दिवसांपूर्वीच निविदा काढल्या आहेत. ही निविदा प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे महामंडळाच्या विलंबाने सुरु असलेल्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत आहे.

    आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष

    कोरोना महामारी आतापर्यंत राज्यभरातील 5408 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 138 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या कोरोनाबांधीत 653 कर्मचाऱ्यांना विविध रुगणालात उपचार सुरू आहेत.
    रोज 13 कोटींचे नुकसान

    एसटी महामंडळात 18 हजाराहून अधिक बस, राज्यात 250 आगारे, 609 बस स्थानके आणि लाखभर कर्मचारी असा माेठा गाडा आहे. एसटी आशिया ख‌ंडातील सर्वात मोठी सार्वजनिक परिवहन सेवा मानली जाते. मात्र, कोरोनामुळे एसटी महमंडळाला दररोज 13 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.