नाल्यांमध्ये कचरा टाकणा-यांवर अधिक कडक कारवाई; CCTV कॅमेऱ्या राहणार वॉच

नाल्यांमध्ये कचरा टाकणारयांवर कठोर कारवाई होणार आहे. दंडात्मक कारवाईसह आता नाल्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे. पर्जन्य जलवाहिन्या, नाले व नद्या यांची नियमितपणे साफ सफाई केली जाते. पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांमध्ये अनेक ठिकाणी प्लास्टिक, वस्तू, कचरा इत्यादी टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास येत असून यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा होतो. परिणामी पाणी तुंबल्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होतो. ही बाब लक्षात घेऊन महापौर किशोरी पेडणेकर, सभागृहनेता विशाखा राऊत आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी विभाग पातळीवर जनजागृती करण्यासह अधिक प्रभावी दंडात्मक कारवाई करण्याचे व सीसीटिव्हीने निगराणी करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

    मुंबई : नाल्यांमध्ये कचरा टाकणारयांवर कठोर कारवाई होणार आहे. दंडात्मक कारवाईसह आता नाल्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे. पर्जन्य जलवाहिन्या, नाले व नद्या यांची नियमितपणे साफ सफाई केली जाते. पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांमध्ये अनेक ठिकाणी प्लास्टिक, वस्तू, कचरा इत्यादी टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास येत असून यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा होतो. परिणामी पाणी तुंबल्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होतो. ही बाब लक्षात घेऊन महापौर किशोरी पेडणेकर, सभागृहनेता विशाखा राऊत आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी विभाग पातळीवर जनजागृती करण्यासह अधिक प्रभावी दंडात्मक कारवाई करण्याचे व सीसीटिव्हीने निगराणी करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

    पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कारवाई सुरु करण्याचे आदेश महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याला दिले आहेत. मनपा प्रशासनाने याबाबत विभाग स्तरावर जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर अधिक कडक कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. प्लास्टिकच्या पिशव्या, वस्तू, कचरा इत्यादी नाल्यांमध्ये टाकणा-या व्यक्तीवर मनपा उप विधीनुसार रु. २०० इतका दंड आकारण्यात येणार आहे. दंड आकारणी अधिक प्रभावीपणे केली जाणार आहे. नाल्यांमध्ये कचरा टाकणार्यानावर आता सीसीटीव्हीचा वॉच राहिल,
    अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे.

    पर्जन्य जलवाहिन्या, नाले इत्यादींची साफसफाई करणे; नवीन पर्जन्य जलवाहिन्या तयार करणे आणि त्यांचे परिरक्षण करणे इत्यादी कामे नियमितपणे करण्यात येतात. मात्र नाले साफ केल्यानंतरही त्यात कचरा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे नाल्यात पाणी तुंबण्याची शक्यता वाढते. प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे पाणी तुंबण्याच्या घटनांमध्ये वाढ होत त्यामुळे कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
    मुंबईत मोठे नाले, छोटे नाले व मिठी नदी यांची एकूण सुमारे ६८९ किलोमीटर आहे. यापैकी मोठ्या नाल्यांची लांबी ही सुमारे २४८ किलोमीटर इतकी आहे. तर छोट्या नाल्यांची लांबी ही सुमारे ४२१ किलोमीटर आहे. या शिवाय २० किलोमीटर एवढी लांबी मिठी नदीची आहे, त्यात कचरा टाकू नये असे आवाहन पालिकेने केले आहे.