haffkine institute

गेल्या दहा महिन्यांपासूनची हाफकीनकडे(haffkine) साधारणत: १०३ कोटी रूपयांची थकबाकी आहे. बिलाची पूर्ण रक्कम दिल्याशिवाय औषध पुरवठा(medicine supply) करणार नाही, थकीत बिलाची रक्कम द्या, असा इशारा देत साेमवार मध्यरात्रीपासून औषध पुरवठादारांनी हाफकीनला औषध पुरवठा करणे बंद करण्यात आला आहे.

मुंबई:गेल्या दहा महिन्यांपासूनची हाफकीनकडे(haffkine) साधारणत: १०३ कोटी रूपयांची थकबाकी आहे. बिलाची पूर्ण रक्कम दिल्याशिवाय औषध पुरवठा(medicine supply) करणार नाही, थकीत बिलाची रक्कम द्या, असा इशारा देत साेमवार मध्यरात्रीपासून औषध पुरवठादारांनी हाफकीनला औषध पुरवठा करणे बंद करण्यात आला आहे. औषध पुरवठादारांचा गुरुवारी संपाचा तिसरा दिवस असून अजूनही सकारात्मक ताेडगा निघाला नसल्याचे ऑल फूड ॲन्ड ड्रग्ज लायसन्स हाेल्डर्स फाऊंडेशनकडून सांगण्यात आले. या संपामुळे गेल्या ३ दिवसांपासून सरकारी रुग्णालयांवर औषध तुटवड्याचा परिणाम झाला आहे.

बिलांचे पैसे चुकते करण्याची मागणी मागील काही महिन्यांपासून ऑल फूड ॲन्ड ड्रग लायसन्स हाेल्डर्स फाऊंडेशन सातत्याने करत आहे. या संदर्भात पुरवठादारांनी अनेकदा निवेदने व आंदोलने केली. पुरावठादारांच्या मागणीला हाफकीन प्रशासनाकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. गेल्या १० महिन्यांतील थकीत बिलांमुळे पुरवठादारांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली असल्याचे पुरवठादार सांगतात. वैद्यकीय शिक्षण व संधोधन संचालनालय अंंतर्गत २१ वैद्यकीय महाविद्यालय आहेत. तर सार्वजनिक आरोग्य विभागाशी संलग्न ३४ छोटी-मोठी रूग्णालये आहेत. या रूग्णालयांना लागणारी औषधे हाफकीन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विकत घ्यावी लागतात. औषध पुरवठा बंद झाल्याने या वैद्यकीय महाविद्यालये तसेच रुग्णालयांत औषध तुटवड्याचा परिणाम झाला आहे.