विरोधकांना नामोहरम करण्याचा भाजपचा डाव, जयंत पाटलांची जोरदार टीका

कोणाची चूक नुसताना केवळ आकसापोटी बदनाम करण्याचे काम केले जात आहे. हा विरोधकांना नामोहरम करण्याचा भाजपचा डाव आहे, असं सांगतानाच खडसे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष पूर्ण ताकदीनिशी उभा आहे, अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली आहे.

    ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचा भाजपचा डाव असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. सध्या ईडीच्या कचाट्यात सापडलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

    कोणाची चूक नुसताना केवळ आकसापोटी बदनाम करण्याचे काम

    या देशात ईडी विरुद्ध बाजूने सतत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. जाचक त्रास देण्याचा प्रयत्न ईडी, सीबीआयसारख्या राष्ट्रीय तपास यंत्रणा करत आहेत. हे जगजाहीर आहे. कोणाची चूक नुसताना केवळ आकसापोटी बदनाम करण्याचे काम केले जात आहे. हा विरोधकांना नामोहरम करण्याचा भाजपचा डाव आहे, असं सांगतानाच खडसे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष पूर्ण ताकदीनिशी उभा आहे, अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली आहे.