Strong performance of Dadar Railway Police; Lost mobile passengers returned

रेल्वे प्रवासादरम्यान गहाळ झालेले मोबाईल रेल्वे प्रवाशांना परत करण्यात आले. दादर रेल्वे पोलिसांनी ही चांगली कामगिरी केली. हरवलेले मोबाईल तात्काळ परत मिळाल्याचा आनंद प्रवाशांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आला.

    मुंबई : रेल्वे प्रवासादरम्यान गहाळ झालेले मोबाईल रेल्वे प्रवाशांना परत करण्यात आले. दादर रेल्वे पोलिसांनी ही चांगली कामगिरी केली. हरवलेले मोबाईल तात्काळ परत मिळाल्याचा आनंद प्रवाशांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आला.

    चिंचपोकाळी रेल्वे स्थानकात गाडी पकडताना सुधीर कदम (५३, रा. चिंचपोकळी, मुंबई) यांचा १० हजार रुपयांचा मोबाईल स्थानकात पडला. सदर मोबाईल रेल्वे स्थानकात कर्तव्यावर असलेल्या पोलीस नाईक शेलार यांना सापडला. योग्य चौकशी करून हा मोबाईल सुधीर कदम यांना परत करण्यात आला.

    दरम्यान, सायन रेल्वे स्थानकात तिकीट काढताना अजय चव्हाण (२३) याचा ११ हजार रुपयांचा मोबाईल काऊंटजवळ विसरला. दादर येथे जाण्याच्या गडबडीत मोबाईल विसरून निघून गेला. सदर मोबाईल कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदार रौधळ व पोलीस नाईक शेंडे यांनी ताब्यात घेतला. मोबाईलबाबत योग्या खात्री करून चव्हाण यांना मोबाईल परत करण्यात आला. मोबाईल परत मिळाल्याने दोन्ही प्रवाशांनी दादर रेल्वे पोलिसांचे आभार मानले.

    हे सुद्धा वाचा