आयकर वाचवण्यासाठीही पत्नीची भक्कम साथ, एकत्र गृह कर्ज घेतल्यास करात सूट; जाणून घ्या

    मुंबई : लग्न झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचे जीवन बदलून जाते. लग्न झाल्यावर जबाबदारी वाढण्यापासून आव्हानही वाढतात. पण जरी तुमच्या जीवनात बदल होत असतील किंवा तुम्हाला आव्हान मिळत असेल तरीही ती सांभाळण्यासाठी तुम्हाला एक भक्कम जोडीदारही मिळतो.

    हा जोडीदार कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि आव्हाने घेण्यास, आर्थिक निर्णय घेण्यास तुम्हाला साथ देतो. विशेष म्हणजे तुमची पत्नी तुम्हाला आर्थिक काटकसर करण्यापासून आयकर वाचवण्यासाठीही (Income Tax Planning) मदत करु शकते.

    एकत्र गृह कर्ज घेतल्यास करात सूट

    जर तुम्हाला दोघांना घर खरेदी करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही जॉईंट गृहकर्ज काढू शकता. यामुळे तुमचा कर वाचू शकतो. विशेष म्हणजे याद्वारे तुम्हाला दोघांना गृह कर्जावरील करात सूट मिळू शकते.

    म्हणजेच कलम 80सी अंतर्गत पती-पत्नी दोघांनाही प्रत्येकी 1.5-1.5 लाख रुपयांची करात सवलत मिळेल. त्यासोबतच सेक्शन 24 (बी) अंतर्गत दोघांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची कर सवलत मिळू शकते, असा दुहेरी लाभ मिळणार आहे.