एसटीची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट, कामगार युनियनकडून संपाचा इशारा

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुले सूट शुल्काच्या थकबाकी म्हणून एसटीला १५०० कोटी रुपये देण्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे. पण एमएसआरटीसीला आपल्या १ लाख कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी सुमारे ३०० कोटींहून जास्त रुपयांची आवश्यकता आहे.

मुंबई : प्रचंड आर्थिक संकटात (financial condition) सापडलेल्या राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट (ST’s financial condition worsens day by day) होत चालली आहे. एसची कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी महानगर पालिकेकडे पैसे नाहीत. कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी राज्य सरकारडे मदत मागितली गेली होती. परंतु सरकारची तिजोरी खाली झाल्यामुळे मदतीस नकार दिला आहे. याआधी राज्य सरकारने दीडशे कोटींची मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे जुलै महिन्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर उर्वरित वेतन ऑगस्ट आणि सप्टेंबर नंतर नोंदविण्यात आले आहे.

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुले सूट शुल्काच्या थकबाकी म्हणून एसटीला १५०० कोटी रुपये देण्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे. पण एमएसआरटीसीला आपल्या १ लाख कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी सुमारे ३०० कोटींहून जास्त रुपयांची आवश्यकता आहे.

एसटी कामगार युनियनकडून संपाचा इशारा (strike by trade unions)

एसटी कामगार युनियनचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले की, अवघ्या एका महिन्याच्या पगारामुळे कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. पुढील दसरा-दीपावलीमध्ये परिवहन कामगारांचे सर्व वेतन द्यावे. मोठ्या संखेने कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आणि त्यांचे वेतन त दिल्यामुळे युनियनने संपावर (strike by trade unions) जाण्याचा इशारा दिला आहे.

एसटी १५०० करोडचे कर्ज घेण्याची तयारीत

एमएसआरसीटीसीने बँकेकडून कर्ज घेण्याची योजना आखली आहे. सहकारी बँकेने एसटीला कर्ज देण्याचे देखील स्वीकारले असल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी राज्य सरकारलाही हमी द्यावी लागेल. राज्यात अनलॉकनंतर एसटीचे कामकाज सुरु झाले आहे. परंतु एसटीचे उत्पन्न पूर्वीच्या तुलनेत कमी होत आहे. बेस्टने एसटीच्या ३५० बस देखील भाड्याने घेतल्या आहेत.

शिवशाही-शिवनेरी बसही तोट्यातच

अनलॉकनंतर मुंबई, ठाण्याहून पुण्याकडे धावणाऱ्या एसी शिवनेरी आणि महाराष्ट्रभर धावणाऱ्या शिवशाही बसेसही तोट्यात धावत आहेत. मुंबईतील जास्त गरज लक्षात घेता कल्याण, वसई, ठाणे ते मुंबई या उपनगरांकडून अधिक शिवशाही बस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे, बहुतेक लोक अजूनही एसी बसेसमध्ये प्रवास पुढे ढकलत आहे. म्हणून शिवनेरी आणि शिवशाही बसमधून अपेक्षित उत्पन्न मिळत नााही.