पर्यटकांसाठी आनंदाची बातमी, मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बस धावणार

मुंबई सेंट्रल-पणजी (Mumbai Central-Panaji) अशी शयन-आसनी बस सेवा ९ डिसेंबर पासून सुरु केली आहे. या बस चिपळूण, कणकवली, सावंतवाडी, म्हापसा मार्गे पणजीला जाईल. सदर बस मुंबई सेंट्रल येथून संध्याकाळी ४.३० वाजता तर पणजी येथून संध्याकाळी ४.०० वाजता सुटणार आहे.

मुंबई: नाताळच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने ( ST Corporation) मुंबई सेंट्रल-पणजी (Mumbai Central-Panaji) अशी शयन-आसनी बस सेवा ९ डिसेंबर पासून सुरु केली आहे. या बस चिपळूण, कणकवली, सावंतवाडी, म्हापसा मार्गे पणजीला जाईल. सदर बस मुंबई सेंट्रल येथून संध्याकाळी ४.३० वाजता तर पणजी येथून संध्याकाळी ४.०० वाजता सुटणार आहे.

तसेच हि बस आगाऊ आरक्षणासाठी एसटी महामंडळाच्या  msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळा बरोबर MSRTC mobile reservation अॅपवर आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध आहे. तरी सदर बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळामार्फत करण्यात येत आहे.

असे आहेत तिकीट दर फलक

मुंबई सेंट्रल- पणजी  ९६५

मुंबई सेंट्रल-म्हापसा  ९५०

मुंबई सेंट्रल- बांदा  ८९५

मुंबई सेंट्रल- सावंतवाडी ८७५

मुंबई सेंट्रल- कणकवली ७८५