राज्यपालांच्या भूमिकेचा विद्यार्थी भारतीने केला निषेध

कल्याण : राज्यपालांच्या भूमिकेचा विद्यार्थी भारती ने फिजिकल डिस्टनसिंग पाळत काळे मास्क घालून निषेध केला.पंतप्रधान यांनी वटहुकूम काढत शंभर वर्षांतील अपवादात्मक स्थिती समजून

 कल्याण :  राज्यपालांच्या भूमिकेचा विद्यार्थी भारती ने फिजिकल डिस्टनसिंग पाळत काळे मास्क घालून निषेध केला.  पंतप्रधान यांनी वटहुकूम काढत शंभर वर्षांतील अपवादात्मक स्थिती समजून भारतातील सर्वच ठिकाणच्या परिक्षा रद्द कराव्यात  असे विद्यार्थी भारती राज्यद्याक्षा मंजिरी धुरी यांनी सांगितले. तसेच परीक्षा रद्द न झाल्यास विद्यार्थी भारती झोप मोड आंदोलन करणार असून कोरोनाच्या काळात  परिक्षावर देखील बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे. 

परिस्थितीचे गांभीर्य न राखता परीक्षेच्या अट्टहासाची राज्यपालांची भूमिका ही विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणारी आहे. याचा राज्यपालांकडून जरादेखील विचार होताना दिसत नाही असा आरोप  राज्य कार्याध्यक्ष प्रणय घरत यांनी केला.या विद्यार्थ्यांना कधी परिक्षा होणार किंवा होणार की नाही, की कोरोनाच्या परिस्थिती परीक्षा द्यावी लागले या संभ्रमात विद्यार्थी अडकले आहे असे राज्य संघटक शुभम राऊत यांनी सांगितले.महाराष्ट्राची परिस्थिती इस्त्राईल सारखी अजिबात होऊ देणार नसल्याचे विद्यार्थी भारतीनेच्या वतीने सांगण्यात आले.