विद्यार्थ्यांना घरुनच देता येणार अंतिम वर्षांच्या परीक्षा, १ तासाची होणार परीक्षा

राज्यपालांच्या गुरुवारच्या बैठकीनंतर कुलगुरूंच्या समितीने आपला अहवाल उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांकडे सादर केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना घरी बसूनच परीक्षा देता येणार आहे. परीक्षा पूर्वीप्रमाणे ३ तासांची होणार नाही. यंदा ती ५० गुणांचीच आणि १ तासाची असेल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी दिली. तर ५० गुणांचे प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे. 

मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासाठी राज्य सरकारने युजीसीच्या निर्णयाला आव्हान दिले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने युजीसीच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्यामुळे अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. परंतु ही परीक्षा ३ तासांऐवजी १ तासाची असेल. (Students can take the final year exams from home) असा निर्णय राज्यसरकारने घेण्यात आला आहे.

राज्यपालांच्या गुरुवारच्या बैठकीनंतर कुलगुरूंच्या समितीने आपला अहवाल उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांकडे सादर केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना घरी बसूनच परीक्षा देता येणार आहे. परीक्षा पूर्वीप्रमाणे ३ तासांची होणार नाही. यंदा ती ५० गुणांचीच आणि १ तासाची असेल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी दिली. तर ५० गुणांचे प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत, असे स्पष्ट केले होते. यानंतर मंत्री सामंत यांनी कुलगुरूंबरोबर अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा घ्यायच्या, याबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी बैठक घेतली होती. परीक्षा पद्धतीबाबत मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली आहे. कुलगुरूंच्या समितीकडून अहवाल आला असून तो विद्यापीठाकडे पाठवण्यात येईल.

परीक्षा कशा पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती ७ सप्टेंबरपर्यंत सरकारला कळवावी अशा सूचना सामंत यांनी राज्यातील अकृषी विद्यापीठांना दिल्या आहेत. अधिकाधिक भर तंत्रज्ञानावर देऊन परीक्षा घेण्यात यावी, असे स्पष्ट करताना त्यांनी परीक्षा या १०० गुणांऐवजी ५० गुणांच्या तर तीन तासांऐवजी एक तासाची असणार असल्याचे संकेत दिले.

अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्य सरकारने कुलगुरूंच्या गठीत केलेल्या १० जणांची समिती स्थापन केली होती. या समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल शुक्रवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला. यामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.

परीक्षा घेताना तंत्रज्ञानावर भर देत लेखी परीक्षांसाठी विद्यापीठाला एमसीक्यू, असाईमेंट किंवा ओपन बूकचे पर्याय खुले केले आहेत. तसेच प्रात्याक्षिक परीक्षा स्काईप सारख्या मिटींग अ‍ॅप किंवा टेलिफोनिक पद्धतीने घेण्याच्या सूचनाही उदय सामंत यांनी केल्या आहेत. परीक्षा पद्धती, वेळापत्रक व अभ्यासक्रम तातडीने जाहीर करावे अशाही सूचना त्यांनी विद्यापीठाला दिल्या.