पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा न घेता वरच्या वर्गात मागील वर्षीप्रमाणेच बढती?

मंत्रालयात पत्रकारांनी गायकवाड यांची भेट घेतली असता त्या म्हणाल्या की, राज्यात सर्वत्र कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने १० -१२वी वगळता अन्य विद्यार्थ्यांना परिक्षा न घेता वरच्या वर्गात मागील वर्षीप्रमाणेच बढती द्यावी लागणार आहे.

    मुंबई. राज्यातील शिक्षणाच्या मुद्यावर पुन्हा एकदा आणिबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. ऐन मार्च – एप्रिल महिन्यात  कोरोनाच्या बळींची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पहिली ते आठवी या वर्गांच्या परिक्षा न घेता विद्यार्थ्यांना गुंणाकन पध्दतीने वरच्या वर्गात बढती देण्याचा निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

    मंत्रालयात पत्रकारांनी गायकवाड यांची भेट घेतली असता त्या म्हणाल्या की, राज्यात सर्वत्र कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने १० -१२वी वगळता अन्य विद्यार्थ्यांना परिक्षा न घेता वरच्या वर्गात मागील वर्षीप्रमाणेच बढती द्यावी लागणार आहे. यासंदर्भात उद्या मंत्रालयात महत्वाची बैटक होणार असून या बैठकीत या बाबत महत्वाचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे