विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडे ! १०० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये २३ मुली

अकरावी प्रवेशासाठीची नोंदणी प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून, पहिली मेरिट लिस्ट २७ ऑगस्टला जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून नुकतीच प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली. या मेरिट लिस्टनुसार मुंबई विभागातील अकरावी प्रवेशासाठी २ लाख २ हजार ५८ विद्यार्थ्यांनी पूर्ण अर्ज भरले आहेत. यातील विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल हा कॉमर्स शाखेकडून असून, तब्बल १ लाख १३ हजार ६१० विद्यार्थ्यांनी कॉमर्स शाखेसाठी अर्ज केले आहेत.

  मुंबई : अकरावी प्रवेशाला(11th college admission) मुंबई विभागातील ३ लाख २० हजार २३० जागांसाठी २ लाख २ हजार ५८ विद्यार्थ्यांनी अर्ज आले आहेत. मात्र, यामध्ये दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांचा ओढा कॉमर्सकडे असला तरी हुशार विद्यार्थ्यांचा कल हा विज्ञान शाखेकडे असल्याचे दिसून येत आहे. शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्टमधील पहिल्या १०० विद्यार्थ्यांमधील ७१ विद्यार्थ्यांनी सायन्स शाखेसाठी तर २२ अर्ज कॉमर्स शाखेसाठी भरले आहेत.

  अकरावी प्रवेशासाठीची नोंदणी प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून, पहिली मेरिट लिस्ट २७ ऑगस्टला जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून नुकतीच प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली. या मेरिट लिस्टनुसार मुंबई विभागातील अकरावी प्रवेशासाठी २ लाख २ हजार ५८ विद्यार्थ्यांनी पूर्ण अर्ज भरले आहेत. यातील विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल हा कॉमर्स शाखेकडून असून, तब्बल १ लाख १३ हजार ६१० विद्यार्थ्यांनी कॉमर्स शाखेसाठी अर्ज केले आहेत.

  त्याखालोखाल सायन्स शाखेसाठी ७० हजार २५४ विद्यार्थ्यांनी तर आर्ट्ससाठी १७ हजार २५४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. कॉमर्स शाखेसाठी विद्यार्थ्यांचे सर्वाधिक अर्ज आले असले तरी गुणवंत विद्यार्थ्यांचा कल हा सायन्स शाखेकडे असल्याचे दिसून येत आहे. प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या पहिल्या १०० विद्यार्थ्यांमधील ७१ विद्यार्थ्यांनी सायन्ससाठी तर २२ विद्यार्थ्यांनी कॉमर्ससाठी तर अवघ्या ७ विद्यार्थ्यांनी कला शाखेसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे मुंबई विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांची सायन्स शाखेतील प्रवेशासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.

  अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये एसएससी बोर्डाच्या १ लाख ८६ हजार १८३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत तर आयसीएसईच्या १०,०५० व सीबीएसईच्या ६३६२ तर अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांची संख्या ५३७ इतकी आहे.

  १०० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फक्त पाच मुले

  अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या यादीमध्ये १०० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २८ आहे. यामध्ये २३ मुली तर पाच मुलांचा समावेश आहे. यामध्ये विज्ञान शाखेला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २२ तर कॉमर्सला चार आणि आर्ट्सला अवघ्या दोन विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

  शाखानिहाय विद्यार्थ्यांची नोंदणी

  सायन्स – ७०,२५४
  कॉमर्स – १,१३,६१०
  आर्ट्स – १७,२५४
  एकूण – २,०२,०३१

  read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]