पदोन्नतीचा विषय: लिपिक कर्मचाऱ्यांचा मोर्चा; सुमारे ३ हजार महापालिका मुख्यालयावर धडकणार

मुंबई महानगर पालिकेतील लिपिकीय संवर्गातील कार्मचाऱ्यांच्या (Clerical Staff) कालबद्ध पदोन्नतीसाठी खात्यांतर्गत परीक्षा घेणारच अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. या संदर्भात तोडगा न निघाल्यास आज शुक्रवारी पालिका मुख्यालयावर (BMC headquarter)मोर्चा काढण्याचा इशारा दि म्युनिसिपल युनियने दिला आहे.

    मुंबई : मुंबई महानगर पालिकेतील लिपिकीय संवर्गातील कार्मचाऱ्यांच्या (Clerical Staff) कालबद्ध पदोन्नतीसाठी खात्यांतर्गत परीक्षा घेणारच अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. या संदर्भात तोडगा न निघाल्यास आज शुक्रवारी पालिका मुख्यालयावर (BMC headquarter)मोर्चा काढण्याचा इशारा दि म्युनिसिपल युनियने दिला आहे.

    कामगार संघटनांनी केलेल्या मागणीची दखलही प्रशासन घेत नसल्याने या प्रश्नावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी सांगितले. सुमारे ३ हजार लिपिकीय कर्मचारी आझाद मैदानात जमून पालिकेच्या मुख्यालयावर धडक देणार आहेत.

    महापालिकेतील लिपिकीय संवर्गाचे जवळपास ३००० कर्मचारी त्यांच्या मागण्यांची दाखल पालिका प्रशासनाने घेतलेली नाही. लिपिकीय संवर्गाच्या कर्मचाऱ्यानी त्यांच्या मागण्याचे निवेदन पालिका आयुक्त चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांना सादर केले होते. त्याची आजपर्यंत दखल घेतलेली नाही, असे बने यांनी सांगितले. पालिका प्रशासनाने याबाबत निर्णय घ्यावा आणि तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी हा मोर्चा असल्याचे बने यांनी सांगितले.