कोरोना पॉझिटिव्ह बाळावर सायन हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया!

मध्यरात्री ३ वाजता डॉक्टरांनी केली शस्त्रक्रिया मुंबई :सायन रुग्णालयातील डॉक्टरांना कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दिड महिन्याच्या बाळाच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. त्यामुळे मेंदूची

मध्यरात्री ३ वाजता डॉक्टरांनी केली शस्त्रक्रिया

मुंबई :सायन रुग्णालयातील डॉक्टरांना कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दिड महिन्याच्या बाळाच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. त्यामुळे मेंदूची संपुर्ण प्रक्रिया बिघडली होती. गाठी तातडीने न काढल्यास बाळाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे सायन हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तातडीने बाळावर शस्त्रक्रिया करत त्याचे प्राण वाचवले व त्याला नव जीवनदान दिले.
 
१३ मे रोजी कावीळ, सर्दी, ताप या लक्षणांमुळे हे बाळ सायन हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. मात्र, बाळाची प्रकृती बिघडत असल्याने त्यांनी त्याची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यानुसार बाळावर उपचार सुरू झाले पण प्रकृती अधिकच खालावल्याने त्याच्या मेंदूचे सीटीस्कॅन केले असता मेंदुमध्ये गाठी झाल्याचे आढळले. त्या गाठी शस्त्रक्रियेशिवाय काढणे सोपे नव्हते. त्यामुळे डॉक्टरांनी सोमवारी मध्यरात्री बाळाच्या प्रकृतीची सर्व काळजी घेत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. 
 
हे बाळ कोरोना पॉझिटिव्ह असल्याने संसर्गाच्या भीतीने शस्त्रक्रिया कशी करायची हा प्रश्न डॉक्टरांसमोर निर्माण झाला होता. परंतु पीपीई किट्स घालुन सहा जणांच्या डॉक्टरांच्या टीमने शस्त्रक्रिया करत त्याच्या मेंदूतून पाणी (फ्लूड) काढल्याची माहिती सायन हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे. दरम्यान, बाळा ची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले.