वर्दीतील माणुसकीचा असाही चेहरा; सोशल मीडियावर हा फोटो होतोय व्हायरल

या फोटोमध्ये एक पोलीस समोर बसलेल्या एका महिलेला प्रेमाणे घास भरवताना दिसतोय. या फोटोला पाहून नेटकरी पोलिसाचे कौतूक करत आहेत. या फोटोकडे पाहून अनेकांनी चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत.

    मुंबई: कोरोनाच्या काळात पोलीस प्रशासनाची विविध रूपे सर्वसामान्य नागरिकांना पाहायला मिळाली. कधी कोरोनाच्या काटेकोर नियमांचे पालन करण्यास भाग पाडताना त्यानाच रुद्रावतारही बघायला मिळाला आहे. बऱ्याचदा पोलीस पाहिल्यानंतर बहुतांश लोक घाबरतात. पोलीस जवळ येताच आता आपले काही खरे नाही, असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, सध्या असा एक प्रसंग समोर आला आहे. ज्यामुळे लोकांचे वरील सर्व समज दूर होतील. सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटमध्ये एक पोलीस म्हाताऱ्या महिलेला आत्मियतेने घास भरवताना दिसतोय.

    या फोटोमध्ये एक पोलीस समोर बसलेल्या एका महिलेला प्रेमाणे घास भरवताना दिसतोय. या फोटोला पाहून नेटकरी पोलिसाचे कौतूक करत आहेत. या फोटोकडे पाहून अनेकांनी चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. फोटोतील पोलिसाचे समर्पण पाहून अनेकांनी त्यााल सॅल्यूट ठोकला आहे.

    सध्या व्हायरल होत असलेला हा फोटो ‘Rinku Hooda’ नावाच्या एका युजरे ट्विटरवर शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी ‘पोलिसांचा एक असाही चेहरा असतो’ असे समर्पक कॅप्शन दिले आहे. या फोटोला आतापर्यंत ६ हजार पेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. काही लोकांनी या फोटोला पाहिल्यानंतर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. या फोटोला सोशल मीडियाच्या अनेक मंचावरुन मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. हा फोटो नक्की कुठला आहे, याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही.