… अशी होती सायरा बानो-दिलीप कुमार यांची ‘लव्हस्टोरी’

सायरा यांनी जेव्हा दिलीप कुमार यांना प्रपोज केले, तेव्हा त्या त्यांच्यापेक्षा २२ वर्षांनी लहान होत्या. यावेळी दिलीप कुमार यांचे वय ४४ वर्षे इतके होते.

    मुंबई: ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं आज सकाळी ७:३० ला हिंदुजा रुग्णालयात निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. भारतीय चित्रपटसुष्टीवर दशकाहून अधिककाळ राज्य केलेले सिनेसृष्टीचे ‘किंग ऑफ ट्रेजेडी’ दिलीप कुमार उर्फ युसूफ खान यांची सायरा बानो यांच्या सोबतची प्रेम कहाणी तितकीच रोमँटिक आहे,

    चित्रपट सृष्टीत साठच्या दशकातील अभिनेत्री नसीम बानो यांची कन्या सायरा दिलीप कुमार यांच्या ‘आन’ या चित्रपटातील अभिनय पाहून खूप प्रभावित झाल्या. दिलीप कुमार यांच्या ब्लॉकबस्टर ‘मुघल-ए-आझम’ नंतर तर त्यात्यांच्यावर फिदाच झाल्या. त्यानंतर एका मुलाखती दरम्यान दिलीप कुमार यांना भेटल्या होत्या. तेव्हा त्यांनी सायराला सुंदर मुलगी असल्याचे म्हटले होते. फार कमी वयातच सायरा बानो दिलीप कुमार यांच्यावर प्रेम करु लागल्या होत्या.
    लंडनमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर सायरा बानो यांनी १९६१मध्ये शम्मी कपूर यांच्या ‘जंगली’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अभिनय तर बहाणा होता दिलीप कुमार यांच्या जवळ येण्याचा. सायरा यांनी जेव्हा दिलीप कुमार यांना प्रपोज केले, तेव्हा त्या त्यांच्यापेक्षा २२ वर्षांनी लहान होत्या. यावेळी दिलीप कुमार यांचे वय ४४ वर्षे इतके होते. सुरुवातीला सायरा यांच्या भावना दिलीप कुमार समजू शकले नव्हते.