‘एकनंबर मुख्यमंत्र्यांचा एकनंबर निर्णय मदिरालय सुरु पण मंदिर बंद’ सुधीर मुनगंटीवार यांची सरकारवर टीका

सरकारने राज्यातील मंदिरे बंदच ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने आता भाजप आक्रमक झाली आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मंदिरांबाबत राज्य सरकारवर टीका केली आहे.

  राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. रुग्ण संख्या कमी होतेय. त्यामुळे सरकार मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील दुकानं, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट्स आदि व्यावसाइकांना काही नियम व अटी लागु करत दुकानं पुर्णवेळ सुरु ठेवण्यास परवानगी देत आहे. हे सर्व सुरु होत असताना सरकारने राज्यातील मंदिरे बंदच ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने आता भाजप आक्रमक झाली आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मंदिरांबाबत राज्य सरकारवर टीका केलीय.

  यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, “मदिरालयावर ज्यांचा विश्वास आहे त्यांना मंदिराशी काही घेणं देणं नाही. बार लायसन्स वाल्यांना सूट देणार देशातील हे पहिलं एकमेव राज्य आहे. ज्यांनी बारवाल्यांची चिंता केली, देशातील नाही तर जगातील क्रमांक एकचे मुख्यमंत्री आणि क्रमांक एकचा निर्णय जो कष्टकरी, फेरीवाले, हात गाडीवाले यांना सूट नाही मात्र बारवाले आणि दारुवाले यांना सूट कारण हेच आपल्या देशातील महत्वाचे लोक आहेत.”

  शिवसेनेला जनतेच्या आशिर्वादाशी काही घेणं देणं नाही

  “जनतेचा आशीर्वाद आणि जनतेचे प्रश्न समजुन घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी हि यात्रा निघाली आहे. भाजप सेना एकत्र असतांना देखील जनतेचा आशीर्वाद मिळत होता. मात्र, त्याच्या विरोधात जाऊन आचरण करणाऱ्यांना जन आशीर्वादाशी काय घेणं देणं पडलंय?”

  मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना कोरोनाची भाषा समजते

  काही लोकांना पशु पक्षाची भाषा समजते काही लोकांना कोरोनाची भाषा समजते, मेट्रोच उद्दघाटन करताना कोरोना यांच्या कानात येऊन सांगतो आता तिसरी लाट येणार नाही. पुण्यातील कार्यालयाच उद्दघाटन करतांना आणि शक्ती प्रदर्शन करतांना तिसरी लाट येत नाही, बिअर बार डान्स बार सुरु केले तर तिसरी लाट येत नाही पण जनतेचं आशीर्वाद घेतला कि तिसरी लाट येते. म्हणजेच कोरोनाची भाषा समजणारे काही नेते महाराष्ट्रात आहेत.