कौटुंबिक वादातून तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले तरुणीचे प्राण

कौंटुबिक वादातून (Family Dispute) इमारतीच्या ६ व्या मजल्यावरून आत्महत्येचा प्रयत्न (Suicide attempt by a young woman) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अंधेरीच्या (Andheri) सहार रोड परिसरात घडली. तसेच ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली आहे. या घटनेमुळे येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई : कौंटुबिक वादातून (Family Dispute) इमारतीच्या ६ व्या मजल्यावरून आत्महत्येचा प्रयत्न (Suicide attempt by a young woman) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अंधेरीच्या (Andheri) सहार रोड परिसरात घडली. तसेच ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली आहे. या घटनेमुळे येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परंतु सुदैवाने कौटुंबिक वादातून आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तरुणीचे अंधेरी पोलिसांनी प्राण (police save her life) वाचवले. अंधेरी पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी-सहार रोड येथील बालाजी इमारतीत ही तरूणी राहते. आज दुपारी ती आत्महत्या करण्यासाठी इमारतीच्या टाकीवर गेली. याची माहिती स्थानिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळवली. काही वेळात अंधेरी पोलीस ठाण्याचे उप निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, बीट मार्शल प्रवीण जाधव, महिला पोलीस हवालदार सोनिया साळवी हे घटनास्थळी गेले. प्रवीण जाधव यांनी तरुणीला बोलण्यात गुंतवले. त्यानंतर तरुणीला टाकीच्या कठडय़ावरून बाजूला केले. तिला सुरक्षित खाली उतरवून पोलीस ठाण्यात नेले.

दरम्यान, तरूणीने कौंटुबिक वादामुळे इतक्या टोकाचे पाऊल का उचलले? या मागील कारण अजूनही अस्पष्ट आहे. परंतु पोलीस या प्रकरणाची पुढील तपासणी करत आहेत.