चेंबूरमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

चेंबूर: चेंबूर येथील सिध्दार्थ कॉलनीत घरातील पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सिध्दार्थ कॉलनीतील

 चेंबूर: चेंबूर येथील सिध्दार्थ कॉलनीत घरातील पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी १२  वाजताच्या सुमारास उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सिध्दार्थ कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी उद्यान जवळ राहाणारा विलास जाधव  हा तरुण मिळेल ते काम करीत होता. आज दारूच्या नशेत असल्याने अचानक त्याला नैराश्य आल्याने दुपारी घरातील माळ्यावर जाऊन फॅनला त्याने गळफास लावून घेतला. घरातील त्याच्या भावांना कळताच त्यांनी चेंबूर पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी येऊन त्याला फॅनवरून खाली उतरून रिक्षातून उपचाराकरिता राजावाडी रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्याचा मृत्यू झाला. बसंत पोलीस ठाणे पुढील तपास करीत आहे.