मध्य रेल्वेच्या हार्बर-ट्रान्स हार्बरमार्गांवर आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक; मेन लाइनच्या प्रवाशांना दिलासा

सीएसएमटीहून सकाळी १०.३४ वाजल्यापासून ते दुपारी ३.३९ वाजेपर्यंत वाशी-बेलापूर-पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर लाइन सेवा आणि सकाळी १०.२१ वाजल्यापासून ते दुपारी ३.४१ वाजेपर्यंत वाशी-बेलापूर-पनवेलहून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

    मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी आज मध्य रेल्वेच्या हार्बर आणि ट्रान्स हार्बर तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाइनवर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. हार्बर लाइनवर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर लाइनवर सकाळी ११.१० वाजल्यापासून ते संध्याकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.

    सीएसएमटीहून सकाळी १०.३४ वाजल्यापासून ते दुपारी ३.३९ वाजेपर्यंत वाशी-बेलापूर-पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर लाइन सेवा आणि सकाळी १०.२१ वाजल्यापासून ते दुपारी ३.४१ वाजेपर्यंत वाशी-बेलापूर-पनवेलहून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. विशेष सेवा ब्लॉक कालावाधीत सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल विभागात चालविण्यात येतील. सकाळी १०.३५ वाजल्यापासून ते संध्याकाळी ४.१९ वाजेपर्यंत ठाण्याहून वाशी-नेरुळ-पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन सेवा आणि पनवेल-नेरुळ-वाशीहून १०.१२ वाजल्यापासून ते ४.०९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप सेवा ब्लॉक कालावधीत रद्द राहतील.

    पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक

    आज सकाळी १०.३५ वाजल्यापासून ते ३.३५ वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेच्या मरिन लाइन्स ते माहीम स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत डाऊन मार्गावरील सर्व धीम्या लोकल्स मरीन लाइन्स ते माहीम स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गांवर चालविण्यात येतील तसेच प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्या कारणाने या लोकल ट्रेन्स महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंबा रोड स्थानकांवर थांबणार नाहीत.

    ब्लॉक कालावधीत प्रवाशांना वांद्रे आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान आपल्या गंतव्य ठिकाणी जाण्याकरिता उलट दिशेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. जम्बो ब्लॉक कालावधीत सर्व धीम्या लोकल चर्चगेट ते माहीम स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर लोअर परेल आणि माहिम स्थानकावर दोन वेळा थांबतील. या बलॉक दरम्यान अप आणि डाऊन दिशेने जाणाऱ्या काही ट्रेन्स रद्द करण्यात येतील. या ब्लॉकची सविस्तर माहिती उपनगरीय स्थानकांच्या सर्व स्टेशनमास्तरांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.