‘सनटेक रियल्टी लिमिटेड’च्या वतीने चौथ्या तिमाही आणि आर्थिक वर्ष २१ करिता कामकाजविषयक अद्यावतीकरणाची घोषणा

आर्थिक वर्ष २१ दरम्यान, आम्ही बळकट पूर्व-विक्री आणि सर्वोच्च वसुली गाठली. आम्ही कामकाज करत असलेल्या सूक्ष्म-बाजार आणि गृह प्रकारांमधील वर्चस्ववादी विकासक म्हणून स्वत:चे पाय रोवण्यात आमची सशक्त कामकाज कामगिरी गुरुकिल्ली ठरली.

 • साल-दरसाल चौथी तिमाही आर्थिक वर्ष २१ च्या पूर्व-विक्रीत ६% पर्यंतची वृद्धी होऊन रु ३७१ कोटींपर्यंतची मजल
 • साल-दरसाल चौथी तिमाही आर्थिक वर्ष २१ च्या महसुलात २७% ची वाढ होऊन रु ३२१ कोटींची उलाढाल
 • चौथी तिमाही आर्थिक वर्ष २१ आणि आर्थिक वर्ष २१ दरम्यान सर्वाधिक वसुली
 • आर्थिक वर्ष २१ मध्ये बळकट तिमाही-आधारीत पूर्व-विक्री आणि वसुलीत भरघोस वाढ
 • उद्योगक्षेत्रात आर्थिक वर्ष २१ दरम्यान आक्रमक प्रकल्प संपादन

मुंबई : सनटेक रियल्टी लिमिटेड हा मुंबईतील महत्त्वपूर्ण रियल इस्टेट डेव्हलपर असून त्यांच्या चौथी तिमाही आणि आर्थिक वर्ष २१ च्या कामकाजाच्या अद्ययावतीकरणाची घोषणा करण्यात आली.

रु.कोटींमध्ये

पूर्व-विक्री

प्रकार

आर्थिक वर्ष २१ ची १ ली तिमाही

आर्थिक वर्ष २१ ची २री तिमाही

आर्थिक वर्ष २१ ची ३ री तिमाही

आर्थिक वर्ष २१ ची ४ थी तिमाही

आर्थिक वर्ष २०

आर्थिक वर्ष २१

बीकेसी प्रकल्प आलिशान ९० ७२ ९०
ओडीसी प्रकल्प मध्यम-उत्पन्न ४१ ५३ १८९ २०१ २७३ ४८४
नायगाव प्रकल्प किफायतशीर ४८ ३२ ६२ ७५ ७६३ २१७
अन्य प्रकल्प मिश्र १२ ११५ ९९ ११३ २३१
एकूण   १०१ २०० ३४९ ३७१ १,२२१ १,०२२

 

रु.कोटींमध्ये

वसुली

प्रकार

आर्थिक वर्ष २१ ची १ ली तिमाही

आर्थिक वर्ष २१ ची २ री तिमाही

आर्थिक वर्ष २१ ची ३ री तिमाही

आर्थिक वर्ष २१ ची ४ थी तिमाही

आर्थिक वर्ष २०

आर्थिक वर्ष २१

बीकेसी प्रकल्प आलिशान ४४ ५१ १०० ९५
ओडीसी प्रकल्प मध्यम-उत्पन्न २९ ३१ ११४ १०४ २६९ २७८
नायगाव प्रकल्प किफायतशीर ३५ ४१ ६५ ८९ २७८ २३०
अन्य प्रकल्प मिश्र २६ ७३ ७७ ६८ १७७
एकूण   ६५ १४१ २५२ ३२१ ७१५ ७८०

आर्थिक वर्ष २१ चौथ्या तिमाहीचे ठळक मुद्दे

 • तिमाही दरम्यान बळकट पूर्व-विक्रीचा अनुभव घेतला.
 • तिमाहीत कधी नव्हे एवढी सर्वोच्च वसुली.
 • असेट लाईट जेडीए मॉडेल अंतर्गत बोरीवली (पश्चिम) येथे ७ एकर जमिनीच्या तुकड्याचे संपादन. मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) च्या पश्चिम उपनगरांत निवासी प्रकल्पाची १ दशलक्ष चौ. फू. विकास क्षमता.
 • तिमाहीत बळकट रोख प्रवाह, ज्यामुळे बिनमहत्त्वाच्या कर्जांमध्ये घट. तिमाहीत सरासरी कर्जातही घट.

 आर्थिक वर्ष २१चे ठळक मुद्दे

 • मध्यम-उत्पन्न गटासाठीच्या ओडीसी, गोरेगाव पश्चिम येथील निवासी प्रकल्पाने सर्वोच्च पूर्व-विक्री गाठली –७७%ची साल दरसाल वृद्धी.
 • सर्व प्रकारच्या रेडी टू मूव्ह प्रकल्पांत बळकट पूर्व-विक्रीचा अनुभव.
 • आर्थिक वर्ष २१ दरम्यान रु ७८० कोटींची सर्वोच्च वसुली.
 • उद्योग क्षेत्रात आर्थिक वर्ष २१ दरम्यान आक्रमक प्रकल्प संपादन पूर्ण – असेट-लाईट धोरणातंर्गत वसई, वासिंद आणि बोरीवली येथील एकंदर ८ दशलक्ष चौ फूटांच्या जागेवर ३ नवीन प्रकल्पांचे संपादन. हे प्रकल्प कंपनीचा रोख प्रवाह आणि आर्थिक ताळेबंद अधिक बळकट करणार.

चौथी तिमाही आणि आर्थिक वर्ष २१ च्या कामकाजी कामगिरीवर बोलताना सनटेक रियल्टी लिमिटेडचे चेअरमन आणि व्यवस्थापक संचालक कमल खेतान म्हणाले की: “आम्ही उद्योगक्षेत्रात बळकट एकत्रीकरणाचा अनुभव करतो आहे आणि आम्ही या ट्रेंडचा सर्वाधिक मोठा लाभार्थी बनणार आहोत. उद्योगक्षेत्राच्या एकत्रीकरणामुळे आगोदरच्या आमच्या एमएमआरमधील वसई, वासिंद आणि बोरीवली या ३ नवीन प्रकल्पांचे संपादन झाले. पुढे जाताना, नवीन वृद्धी संधींचे मूल्यांकन करताना आमच्या ब्रँड फ्रंचाईजी आणि व्यवस्थापन तज्ज्ञतेला चालना मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. ज्यामुळे आमचा एकंदर मार्केट शेअर वाढेल.

आर्थिक वर्ष २१ दरम्यान, आम्ही बळकट पूर्व-विक्री आणि सर्वोच्च वसुली गाठली. आम्ही कामकाज करत असलेल्या सूक्ष्म-बाजार आणि गृह प्रकारांमधील वर्चस्ववादी विकासक म्हणून स्वत:चे पाय रोवण्यात आमची सशक्त कामकाज कामगिरी गुरुकिल्ली ठरली. त्याशिवाय, आमची विक्री आणि विपणन तसेच इन-हाऊस बांधकाम क्षमतेत आमच्या महत्त्वाच्या क्षमतेवर भर राहिला, ज्यामुळे आम्हाला हा बळकट पूर्व-विक्री आणि वसुलीचा ट्रेंड आणखी पुढे नेणे शक्य होईल.”